मराठवाडा
भारतातील पहिली आणि जगातील तिसरी लेजर ग्रॅव्हीटेशनल वेधशाळा LIGO औंढा नागनाथ येथे स्थापन्यास खासदार डॉ फौजिया खान यांचा प्रयत्नांना यश
परभणी: (जिल्हा प्रतिनिधी मोहम्मद बारी). परभणी जिल्हयाचे लगत दुधाळा ता. औंढा नागनाथ जि. हिंगोली येथे LIGO लिगो वेधशाळा सुरु करण्यासाठी राज्यसभा खासदार डॉ फौजिया खान यांनी दिनांक २३ मार्च २०२३ रोजी देशाचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन या प्रकल्पाची सुरुवात लवकर करावी असा आग्रह धरला. त्यास अनुसरुन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केंद्रीय मंत्रीमंडळात हा विषय घेऊन या वेधशाळेच्या स्थापनेचा महत्वपुर्ण निर्णय घेतला आहे. त्याबद्दल त्यांचे खासदार डॉ फौजिया खान यांनी आभार व्यक्त केले आहेत.
हिंगोली जिल्हयात मौजे दुधाळा ता. औंढा नागनाथ येथे लिगो वेधशाळा स्थापन करण्याबाबत अमेरीके सोबत पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांचे पुढाकराने व त्यांचे उपस्थीतीत दिनांक ३०.०३.२०१६ रोजी सामंजस्य करार झाला होता. परंतु ही वेधशाळा बाबत पुढील कार्यवाही झालेली नव्हती.
राज्यसभा खासदार डॉ फौजिया खान यांनी परभणी व हिंगोली जिल्हयाचे विकासाचे दृष्टीने तसेच देशाचे हिताचे दृष्टीने दिनांक २८ फेब्रुवारी २०२३ रोजी पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांना निवेदन दिले होते.
त्यानंतर दिनांक २३ मार्च २०२३ रोजी त्यांची प्रत्यक्ष भेट घेऊन केंद्रीय मंत्रीमंडळात हा विषय घ्यावा, त्यास मान्यता देऊन आवश्यक निधीची तरतुद करावी आणि ही लिगो वेधशाळा तात्काळ कार्यान्वीत करण्यासाठी विनंती केली होती. तसेच त्या भागात नाविन्यपुर्ण अशी “सायन्स सिटी” स्थापन करावी जेणे करुन या भागातील लोकांना चांगले रस्ते, सुविधा, संशोधनाच्या व विकासाच्या संधी उपलब्ध होतील तसेच या भागातील विकासास चालना मिळू शकेल. यासाठी खासदार डॉ फौजिया खान यांनी त्यांचे कडे आग्राह धरला होता.
त्यावेळी त्यांनी याबाबत लक्ष देऊन याबाबत लवकरच निर्णय घेण्यात येईल असे आश्वस्त केले होते. त्यांनी कालचे केंद्रीय मंत्रीमंडळाचे बैठकीत औंढा नागनाथ येथील लीगो वेधशाळा स्थापन करण्यास मान्यता देऊन यासाठी २६०० कोटी रुपयांची निधीची तरतुद केली. अशा प्रकारे त्यांनी दिलेला शब्द पाळला आहे. यामुळे परभणी हिंगोली जिल्हयाचे विकासास चालना मिळणार आहे. त्याच बरोबर आंतरराष्ट्रीय स्तरावरील ही तीसरी वेधशाळा होत असल्याने हिंगोली परभणी जिल्हयाची आंतरराष्ट्रीय स्तरावरुन ओळख निर्माण होणार आहे. यासर्व बाबी बद्दल देशाचेB पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांचे तसेच या प्रस्तावाबाबत पाठपुरावा करणाऱ्या खासदार डॉ फौजिया खान यांचे सर्व स्तरातून अभिनंदन करण्यात येत आहे.