क्राईम
दरोडयासह खुनाचा प्रयत्न करणारे तिन आरोपी अटक स्थानिक गुन्हे शाखा नांदेड ची कार्यवाही
सहा आरोपीतांनी समाधान होटलसमोर विष्णुपुरी नदिड येथील इश्वर मारोतराव हंबर्डे यांना खंडणीची मागणी करून जीवे मारण्याचा प्रयत्न केला होता त्यावरून पोलीस ठाणे नदिड ग्रामीण गुरनं. 159/2023 कलम 307,384,34 भादवि राह 4/25 शरत अधिनियम प्रमाणे गुन्हा दाखल होता. तसेच दुसन्या घटनेमध्ये फारुखनगर नदिड येथील रमेश राजाराम हिवराळे यारा अडवुन दरोडयासह खुनाचा प्रयत्न केला होता. त्यावरुन पोलीस ठाणे विमानतळ गुरनं. 80/2023 कलम 307,395,397,398,342 भा द वि सहकलम 4/25 शस्त्र अधिनियम प्रमाणे गुन्हा दाखल होवुन सदर गुन्हयातील आरोपीतांचा शोध घेणे चालु होते.
सदर गुन्हयांचे अनुषंगाने आज दिनांक 15/03/2023 रोजी श्री व्दारकादास चिखलीकर, पोलीस निरीक्षक स्थागूशा नदिड यांना गूप्त बातमीदाराकडून खात्रीशीर माहीती मिळाली की, सदर गुन्हयातील आरोपी नामे 1) अविनाश सोम भारती वय 20 वर्ष व्यवसाय बेकार रा. जिल्हा परिषद शाळेजवळ, विष्णुपुरी नांदेड 2) रितेष राजकुमार सोनवणे वय 20 वर्ष व्यवसाय बेकार रा. नागसेननगर पावडेवाडी नाका, नांदेड 3) अंकुश ऊर्फ प्रद्युम पि. हरीहर हंबर्डे वय 24 वर्ष व्यवसाय बेकार रा. मारोतीमंदीरजवळ, विष्णुपुरी नांदेड हे पावडेवाडी शिवारात आहेत वगैरे माहीती मिळाल्याने त्यांनी स्थागुशाचे पथक रवाना करुन नमुद आरोपीतांना सापळा रचुन ताब्यात घेण्यात आले आहे.
नमुद आरोपीतांना गुन्हयाबाबत विचारपुस करता त्यांनी 1) पोलीस ठाणे नांदेड ग्रामीण गुरनं. 148/2023 कलम 307,34 भा. दं. वि. सहकलम 4/27 शस्त्र अधिनियम 2) पोलीस ठाणे विमानतळ गुरनं. 80/2023 कलम 307, 395,397,398,342 भा. दं. वि. सहकलम 4/25 शस्त्र अधिनियम 3) पोलीस ठाणे मोजपुरी जिल्हा जालना गुरनं. 70/2023 कलम 394,34 भा. दं. वि. 4) पोलीस ठाणे नांदेड ग्रामीण गुरनं. 159/2023 कलम 307,384,34 भादवि सह 4/25 शस्त्र अधिनियम असे गुन्हे केल्याची कबुली दिली आहे. सदर तिनही आरोपीतांना पुढील कायदेशिर कार्यवाहीकामी पोलीस ठाणे नदिड ग्रामीण यांचे ताब्यात दिले आहे. सदर आरोपी कडुन आणखीन गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे.
सदरची कामगिरी मा. श्री श्रीकृष्ण कोकाटे, पोलीस अधीक्षक, नांदड, मा. श्री अबिनाश कुमार अपर पोलीस अधीक्षक, नांदड, मा. श्री खंडेराव धरणे, अपर पोलीस अधीक्षक, भोकर, यांच्या मार्गदर्शनाखाली, श्री व्दारकादास चिखलीकर पोलीस निरीक्षक स्थागूशा नांदेड, सपोनि / पांडुरंग माने, पोउपनि / दत्तात्रय काळे, पो कॉ / तानाजी येळगे, पो काँ/मोतीराम पवार, पोकॉ/ विलास कदम, महेश बडगु, चापोकों/ हेमंत बिचकेवार यांनी पार पाडली आहे. सदर पथकाचे मा. पोलीस अधीक्षक नदिड यांनी कौतुक केले आहे.