मराठवाडा
अखेर परभणी गंगाखेड रोड वरील गोदावरी नदीवरील पुलास मिळाली मान्यता
निधीच्या तरतुदीसह लवकरच टेंडर निघणार असल्याची केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्रालयाने दिली माहिती खासदार फौजिया खान यांच्या पाठपुराव्याला यश
परभणी प्रतिनिधी
परभणी गंगाखेड रोड हा सिमेंट रोड झाला असून वाहतूक देखील मोठ्या प्रमाणावर वाढली आहे पण या रोडवरील गोदावरी नदीवरील पूल मात्र जुनाच आहे या पुलावरून वाहतूक सुरळीत होत नव्हती आणि पूल देखील जीर्ण झाला होता. त्या अनुषंगाने खासदार फौजिया खान यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना 9 डिसेंबर 2022 रोजी पत्र देऊन नवीन पूल मंजूर करावा अशी मागणी केली होती.
या मागणीला यश आले असून या बजेटमध्ये गोदावरी नदीवरील पुलासाठी निधीची तरतूद करण्यात आली आहे. लवकरच या ठिकाणी नवीन पूल निर्माण होणार असल्याचे पत्र देखील खासदार फौजिया खान यांना संबंधित मंत्रालयाकडून सहा जानेवारी 2023 रोजी पत्र पाठवून कळविण्यात आले आहे.
गोदावरी नदीवरील पूल झाल्यावर परभणी गंगाखेड रोडवरील वाहतूक अत्यंत सुरळीत होणारा आहे. सध्या त्या पुलावर मोठ मोठाले खड्डे पडले आहेत आणि तो पूल देखील जीर्ण झाला आहे. पण आता नवीन पूल मंजूर झाल्यामुळे लवकरच प्रवाशां