देश विदेश

रेशन कार्डधारकांना लागली लॉटरी! आता गहू, तांदळासोबत ‘या’ वस्तूही मिळणार मोफत

केंद्र आणि राज्य सरकार जनतेच्या हितासाठी अनेक योजना राबवत असते. याचा त्यांना फायदाही होत असतो. जर तुम्ही मोफत अन्नधान्य घेत असाल तर तुमच्यासाठी एक महत्त्वाची आणि आनंदाची बातमी आहे.

कारण आता शिधापत्रिकाधारकांना गहू, तांदूळ सोबत काही वस्तूही मोफत मिळणार आहेत.

सरकारच्या या निर्णयामुळे याचा फायदा लाखो लोकांना होणार आहे. याबाबत सरकारने आदेश जारी केला आहे. इतकेच नाही तर आता तुम्हाला तुम्हाला इतर वस्तूही अगदी कमी किमतीत मिळू शकतात. काय आहे हा सरकारचा आदेश जाणून घेऊयात सविस्तर.

ब्रेकिंग बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिककरा

23 लाख कुटुंबांना मिळणार लाभ

केंद्र सरकार तसेच राज्य सरकारकडून अनेक सुविधा नागरिकांना देण्यात येतात. अशातच आता उत्तराखंड सरकार कमी किमतीत साखर आणि मीठ याशिवाय 23 लाख कुटुंबांना मोफत रेशन देण्याची योजना बनवत आहे.

तब्बल 65 लाख कोटींचा अतिरिक्त येणार खर्च

याबाबत माहिती देत असताना उत्तराखंडच्या अन्नमंत्र्यांनी असे सांगितले की, विभागाने या योजनेसाठी बजेट प्रस्तावही तयार केला आहे. आता लवकर ते मंत्रिमंडळात मांडले जाणार आहे. ही योजना लागू केल्यानंतर राज्याला एकूण 65 लाख कोटी रुपयांचा अतिरिक्त खर्च सहन करावा लागणार आहे.

सर्व जीवनावश्यक वस्तू उपलब्ध होणार

माध्यमांना माहिती देत असताना अन्न मंत्र्यांनी असे सांगितले की, 2023 मध्ये केंद्र सरकारने देशभरातील कुटुंबांना मोफत रेशन देण्याचा निर्णय घेतला आहे. या संपूर्ण वर्षात लाभार्थ्यांना मोफत रेशनचा लाभ दिला जाणार आहे. गहू आणि तांदूळ तसेच साखर आणि मीठ यासारख्या जीवनावश्यक वस्तू प्रत्येक स्वयंपाकघरात उपलब्ध व्हाव्यात, असे राज्य सरकारने म्हटले आहे.

आता साखरेवर अनुदान दिले जाणार

साखरेवर 10 रुपये प्रतिकिलो सबसिडी देण्याची सूचना केली आहे. यात15 रुपयांपर्यंत वाढ करता येईल. माहिती देताना राज्य सरकारने असे सांगितले की, जे कार्डधारक गेल्या 6 महिन्यांपासून रेशन घेत नाहीत त्यांची कार्डे रद्द करण्यात येऊ शकतात.

Munawar Khan

या पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो नांदेड न्यायालयांतर्गत राहील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button