पीपल्स कॉलेज मध्ये बाल साहित्यावर राष्ट्रीय संमेलन संपन्न
नांदेड दि८ येथील नांदेड एज्युकेशन सोसायटी संचालित पीपल्स कॉलेज नांदेड व स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित “बाल साहित्य के विविध आयाम” या विषयावर एक दिवसीय राष्ट्रीय संमेलनाचे आयोजन करण्यात आले या संमेलनामध्ये बालसाहित्याच्या विविध अंगांवर सखोल चर्चा करण्यात आली.सदरिल संमेलन चार सत्रामध्ये घेण्यात आले. पहिल्या सत्रामध्ये संमेलनाचे उद्घाटक वरिष्ठ चर्चित बाल साहित्यकार डॉ. परशुराम शुक्ल यांच्या हस्ते झाले अध्यक्षस्थानी डॉ. व्यंकटेश काब्दे (अध्यक्ष, नांदेड एज्युकेशन सोसायटी नांदेड)हे होते.
प्रमुख पाहुणे म्हणून सी.ए. डॉ. प्रवीण पाटील (उपाध्यक्ष नांदेड एज्युकेशन सोसायटी नांदेड), डॉ.अरुणकुमार शुक्ला (आयकर अधिकारी दिल्ली), डॉ.विलास सुकाळे (सहाय्यक अधिष्ठाता, स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड), प्राचार्य डॉ.आर.एम. जाधव (पीपल्स कॉलेज, नांदेड) होते. सर्व मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त करून उद्घाटनाची औपचारिकता पूर्ण केली. वरिष्ठ व चर्चित साहित्यकार डॉ.परशुराम शुक्ल यांनी बालसाहित्याचे स्वरूप व सैध्दांतिक पक्षावर सखोल मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमासाठी 300 पेक्षा अधिक प्राध्यापक, विद्यार्थी व संशोधकांनी सहभाग नोंदविला. तसेच देशातील विविध भागातून आलेल्या प्राध्यापक आणि संशोधकांनी आपले शोध निबंधाचे वाचन केले.
एक दिवसीय राष्ट्रीय संमेलन यशस्वी करण्यासाठी संयोजक प्राचार्य डॉ.रावसाहेब जाधव, प्रो.डॉ.भगवान जाधव,डॉ. मुकुंद कवड आणि महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी आदीनी परिश्रम घेतले.