महाराष्ट्रा

आमदार बच्चू कडू यांना नाशिक जिल्हा सत्र न्यायालयाने सुनावली 2 वर्षांची शिक्षा

आमदार बच्चू कडू यांना सरकारी कामात अडथळा आणणे चांगलेच भोवले आहे.

सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी आमदार बच्चू कडू यांना दोन वर्षाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. नाशिक जिल्हा सत्र न्यायालयाने याबाबत महत्वपूर्ण निकाल दिला आहे. दरम्यान 15 हजार रुपयांच्या जात मुचलक्यावर बच्चू कडू यांना जामीन मंजूर करण्यात आला आहे.

अपक्ष आमदार बच्चू कडू यांना सरकारी कामात अडथळा आणणे चांगलेच भोवले आहे. नाशिक महापालिकाआयुक्तांवर आमदार बच्चू कडू यांनी हात उगारला होता. हे प्रकरण कोर्टात पोहोचले होते. या प्रकरणात बच्चू कडू यांना कोर्टाने दोन वर्षांची शिक्षा ठोठावली आहे. दिव्यांगांच्या मागण्यांसाठी 2017 साली आमदार बच्चू कडू यांनी महापालिकेत आंदोलन केलं होते. आंदोलना दरम्यान बच्चू कडू यांनी तत्कालीन महापालिका आयुक्तांवर हात उगारला होता. सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी 2 वर्षांची शिक्षा नाशिकजिल्हा सत्र न्यायालयाने सुनावली आहे.

दरम्यान प्रहारच्या माध्यमातून नाशिक महापालिकेने दिव्यांग कल्याण निधी खर्च केला नाही, याबाबत आंदोलन सुरु होते. यावेळी प्रहारच्या शिष्टमंडळाकडून तत्कालीन आयुक्तांची भेट घेण्यात आली होती. यावेळी आमदार बच्चू कडू आणि तत्कालीन महापालिका आयुक्त अभिषेक कृष्णा यांच्यात चकमक झाली होती. सरकारवाडा पोलीस स्टेशन येथे याप्रकरणी गुन्हा नोंदविला होता. दरम्यान याप्रकरणी सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी एक तर सरकारी अधिकाऱ्याला अपमानित केल्याप्रकरणी एक अशी 2 वर्षांची शिक्षा नाशिक जिल्हा सत्र न्यायालयाने सुनावली आहे.

दरम्यान अपंग पुनर्वसन कायद्याची अंमलबजावणी झाली नसल्याकारणानं तत्कालीन आयुक्त अभिषेक कृष्ण यांना घेराव घालण्यात आला होता. त्याचवेळी बाचाबाची झाल्यानं बच्चू कडू यांनी आयुक्तांवरच थेट हात उगारला होता. नाशिक महापालिकेनं 1995 चा अपंग पुनर्वसन कायदा अद्याप अंमलात आणला नाही. तसेच अपंगांचा राखीव तीन टक्के निधी खर्च केला जात नसल्यामुळे मनपा मुख्यालयासमोर प्रहार संघटनेच्या वतीनं धरणे आंदोलन करण्यात आलं होत.

काय आहे नेमकं प्रकरण?

आमदार बच्चू कडूराज्यातील दिव्यांग बांधवासाठी काम करणारे नेतृत्व म्हणून ओळखले जाते. दरम्यान नाशिक महापालिकेने दिव्यांग कल्याण निधी खर्च केला नाही, म्हणून 2017 मध्ये प्रहार संघटनेच्या वतीने नाशिक महापालिकेवर आंदोलन करण्यात आलं होते. यावेळी आमदार बच्चू कडू यांच्या नेतृत्वात शिष्टमंडळाने तत्कालीन महापालिका आयुक्त अभिषेक कृष्णा यांची भेट घेतली होती. या भेटीदरम्यान त्यांच्यात शाब्दिक वाद झाला. यावेळी बच्चू कडू यांचा संयम सुटला आणि ते आयुक्त अभिषेक कृष्णा यांच्या अंगावर धावून गेले. त्यांनी आयुक्तांना शिवीगाळ करत त्यांच्यावर हात उगारण्यात आल्याचे सांगितले जाते. यावेळी पोलीस कर्मचाऱ्यांनी मध्यस्थी करत वाद सोडविला होता.

Munawar Khan

या पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो नांदेड न्यायालयांतर्गत राहील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button