जिला
नांदेड चौफेरच्या संपादकांना फिल्मी अॅक्टर अरबाज खान हस्ते अॅन्टी करप्शन फाऊडेशन ऑफ इंडिया इन्टरनॅशनल डायरेक्टर पदी नियुक्ती व ग्लोबल अवार्डने सन्मानीत
नांदेड (जि.प्र.) – अॅन्टी करप्शन फाऊन्डेशन ऑफ इंडियाच्या वतीने हरियाणा येथील फाईव्ह स्टार रुतबा हॉटेलात अलिशान शाही परंपरेनुसार मोठ्या थाटामाटात दि. 5 मार्च रोजी पुरस्कार सोहळा संपन्न झाला. या कार्यक्रमास आवर्जुन उपस्थित असलेले दैनिक नांदेड चौफेरचे संपादक डॉ. मोहम्मद आरेफखान पठान होते जे 11 मार्च रोजी त्यांना दुबई येथे आयफा वर्ल्ड बॉलीवुडचा पुरस्कार मिळणार होता मात्र पठान यांनी विदेशातील कार्यक्रमाला बगल देऊन भारतीय आयोजकांचा सन्मान राखत हरियाणा येथील स्वकीय पुरस्कार फिल्मी हिरो अरबाज खान यांच्या कार्यक्रमाला हजेरी लावली हे विशेष.
दि. 5 मार्च रोजी अॅन्टी करप्शन फाऊन्डेशन ऑफ इंडियाचे नॅशनल प्रेसीडेन्ट नरेंद्रजी अरोरा यांनी सामाजिक कार्यकर्ते तथा नांदेड चौफेरचे सामाजिक कार्य, धुरंदर लेखनीतुन चांगले कार्य राबवित असल्याने आणि निर्भीड, प्रखरपणे बातम्या प्रकाशीत करुन जनतेत सत्य उघडपणे वृत्तपत्राचया माध्यमातुन जनतेला एक चांगला संदेश जात आहे. ज्यामुळे अरोराजींनी फिल्मी हिरो अरबाज खान यांची भेट घडवुन आणण्याचे नियोजन केले होते. जो कार्यक्रमाच्या दरम्यान त्यांची भेट घडवुन आणली आणि अरबाज खान यांनी दैनिक नांदेड चौफेर वृत्तमानपत्र त्यांचे सोबत असलेले बॉडीगार्ड यांनी मराठीतुन वाचवुन दाखविले. जे वृत्तपत्र स्वता 3 मार्च रोजीचे वृत्तमानपत्र पाहुन अरबाज खान हे गहीवर झाले तसेच त्यांनी पन्नास प्रती सोबत सुध्दा नेलेल्या आहेत. ज्यांचा मला अभिमान वाटतो.
नांदेड जिल्ह्यातील डॉ. मोहम्मद आरेफखान पठान ही एकमेव व्यक्ती आहे जे दोन महिन्यांच्या अवधीत दोन बॉलीवुड कलाकार रजा मुराद व अरबाज खान यांचे मानकरी ठरले तर फेब्रुवारीत वलभगड विद्यापिठातुन डॉक्टरेट पदवी प्रमाणीत मिळविली म्हणजे जानेवारी ते मार्च या दरम्यान तीन अत्यंत महत्वाची कार्यसेवेचे फळ पठान यांना मिळालेले आहे. ते नांदेडकरांसाठी बहुमोल आहे. जे दोन वर्षाच्या काळात राज्यस्तरीय, नॅशनल देश पातळीवर असे 19 पुरस्कार प्राप्त पठान यांना लाभलेला असुन ते खरोखरच अभीनंदनास पात्र आहेत. जी व्यक्ती कोणत्याही दबावाला, अमीषाला बळी न पडता समाजसेवा हिच ईश्वरसेवा या उपक्रमातुन त्यांनी जन मानसात जागृतीचे कार्य केलेले आहे. त्यामुळेच त्यांना ठिकठिकाणी पुरस्कार मिळत आहेत.
या सोहळ्याला उपस्थित फिल्म अॅन्ड टिव्ही अॅक्टर मुस्कान व टिना आहुजा, जन्नत जुबेर, आकांक्षा शर्मा, सिंगर पंजाबी मेहताब विर्क होते. या कार्यक्रमात हजारोंच्या संख्येने 18 राज्यातुन पदाधिकारी उपस्थित होते. अॅन्टी करप्शन फाऊंडेशन ऑफ इंडिया मध्ये संबंधीत 18 राज्यातील पदाधिकारी यांची इन्टरनॅशनल डायरेक्टर डॉ. मो. आरेफखान पठान यांच्या हस्ते नियुक्ती करण्यात आली आहे आणि अरबाज खान यांच्या हस्ते व सर्व मान्यवरांच्या उपस्थित डॉ. मोहम्मद आरेफखान पठान यांना इन्टरनॅशनल डायरेक्टरची नियुक्ती देऊन व ग्लोबल अवॉर्ड ने सन्मानीत केलेली आहे. जे आमचे नॅशनल प्रेसीडेन्ट नरेंद्रजी अरोरा यांचे मार्गदर्शन लाभलेले आहे. ज्यामुळे मी इथपर्यंत पोहोचलो हे स्वप्न मी भविष्यातही पाहिलेले नाही मात्र माझे स्वप्न साकार होत असल्याचे मी अनुभव घेत आहोत. हे माझे भाग्य समजतो आणि पुढेही असेच सामाजिक कार्य सुरुच राहील आणि जनतेची सेवा करीन असे गौरवोदगार पठान यांनी आपल्या भाषणात नमुद केलेले आहे.