शिक्षण
एसआयओ नांदेड शाखेच्या वतीने महाराष्ट्र अर्थसंकल्पीय अधिवेशन २०२३-२४ मध्ये अल्पसंक्यांक विद्यार्थियांच्या विविध मागण्या
नांदेड : अल्पसंक्यांक विद्यार्थियांच्या विविध मागण्या विधानसभेत उठवन्यासाठी स्टुडेंट इस्लामिक ऑर्गनायजेशन ऑफ़ इंडिया च्या नांदेड शाखेतर्फे नांदेड दक्षिण चे आमदार मोहनराव हम्बर्डे यांना निवेदन देऊन मागणी करण्यात आली.
एस-आय-ओ गेल्या ४० वर्षा पासून देशात विद्यार्थी आणि तरुणांच्या शैक्षणिक, नैतिक आणि आध्यात्मिक उन्नतिसाठी सक्रिय आहे तसेच शिक्षणाच्या संदर्भात शैक्षणिक न्याय व शिक्षणाच्या दर्जा उंचावन्यासाठी विशेष प्रयत्नशील आहे,
महाराष्ट्र राज्याच्या आगामी अर्थसंकल्पाच्या दृष्टीने संघटनेने काही महत्त्वाचे मुद्दे सुचवले ज्यांचा राज्याचा अर्थसंकल्प तयार करताना विचार करता येईल. या शिफारशीद्वारे SIO नांदेड च्या वतीने आमदार मोहनराव हम्बर्डे यांच्याशी सविस्तर संवाद झाला एस-आय-ओ दक्षिण महाराष्ट्रने सरकार समोर खालील मागण्या केल्या १)महाराष्ट्र शासनाने अनुसूचित जाती – अनुसूचित जमातिंच्या विधार्थ्यांच्या शैक्षणिक विकासासाठी 1978 साली ‘बार्टी’ ही संस्था स्थापण केली. तसेच मराठा व कुनबी मराठा समाजासाठी 2018 साली ‘सारथी’ आणि इतर मागास्वर्गियांसाठी ‘महाज्योति’ ही स्वायत्त संस्था स्थापन केली. त्याच धर्तीवर मुस्लिम समाजच्या विधार्थ्यां विधार्थ्यांच्या आर्थिक, सामाजिक आणि शैक्षणिक उन्नतिसाठी ‘डॉ. APJ अब्दुल कलाम संशोधन, प्रशिक्षण आणि मानव विकास संस्था’ या नावाने एक स्वायत्त संस्था स्थापन करण्यात यावि या प्रमुख मागणी सोबत,
2) शिक्षणासाठी अर्थसंकल्पात एकून तरतुदिपैकी 20% तरतूद करण्यात यावि.
3) RTE (2019) कायद्याच्या प्रभावी अमलबजावणीसाठी आणि देखरेखीसाठी एक संयुक्त पक्ष समिति (JPC) स्थापन करण्यात यावि.
4) मौलाना आज़ाद अल्पसंख्यक आयोग महाराष्ट्र कर्जधारित शिष्यव्रूत्ति जारी करत नाही. लाप्स रक्कम सुमारे 300 कोटी आहे, ति जारी करण्यात यावि.
5) केंद्राच्या मदरसा आधुनिकीकरण योजनेची रक्कम वितरित करण्यात यावि.
6) राज्यात ज्या शहरांत अल्पसंख्यक मुलींची वस्तिग्रहे प्रलंबित आहेत ती लवकरात लवकर मार्गी लावावित.
या प्रमुख मागनींचे एक निवेदन आ. हम्बर्डे यांना देण्यात आले आणि हे प्रश्न विधानसभेत मांडावे अशी विनंती करण्यात आली.
या वेळी SIO नांदेड सचिव मुशर्रफ फहद आणि इतर सदस्य उपस्थित होते.