क्राईम

नांदेडात पुन्हा गोळीबार; एक ठार

 
नांदेड : 26 Feb / नांदेडच्या सिडको भागातील जुन्या वसंतराव नाईक महाविद्यालयात समोर गोळीबार करून एकाची हत्या केल्याची घटना शनिवारी रात्री ९ वाजेच्या दरम्यान घडली. या घटनेमुळे शहर परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे नांदेडमध्ये पुन्हा गोळीबार झाल्यामुळे शहरात खळबळ उडाली.

सिडको येथील राज प्रदीप सरपे(२२) रा. सिडको हा रात्री ९ वाजताच्या दरम्यान सिडको येथील जुने नाईक महाविद्यालया समोरून जात असताना, अज्ञात मारेक-यांनी पिस्तुलमधून त्याच्यावर गोळीबार केला. यात गंभीर जखमी झाला. यानंतर पुढील उपचारासाठी त्याला विष्णुपुरी येथील शासकीय रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. अज्ञात मारेक-यांनी नेमकी हत्या कोणत्या कारणावरून करण्यात आली हे समजू शकले नाही. या घटनेनंतर आरोपी घटना स्थळवरून फरार झाला. या प्रकरणी वृत्त लिहीपर्यंत ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरू होती.

Munawar Khan

या पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो नांदेड न्यायालयांतर्गत राहील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button