कै. वसंतराव काळे महाविद्यालयात संत गाडगे महाराज जयंती साजरी
नांदेड दि.२३ स्वच्छता व शिक्षणाचे महत्त्व समाजाला पटवून देणारे संत शिरोमणी गाडगे महाराज यांची जयंती कै.वसंतराव काळे वरिष्ठ महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभागामार्फत साजरी करण्यात आली.यावेळी संस्थापक अध्यक्ष प्रा.मजरुद्दीन यांनी संत शिरोमणी गाडगे महाराज यांच्या जीवन कार्याचा थोडक्यात आढावा घेतला त्यामध्ये त्यांनी संत गाडगे महाराज हे गोरगरीब, दीनदलित यांच्यामधील अज्ञान, अंधश्रद्धा, अस्वच्छता यांचे उच्चाटन करण्यासाठी कार्य करणारे समाजसुधारक होते,असे सांगितले तर प्रा. मारुती भोसले यांनी तीर्थी धोंडापाणी देव रोकडा सज्जनी |” असे सांगत दीन, दुबळे, अनाथ, शोषित पीडित अपंगांची सेवा करणारे थोर संत म्हणजे गाडगे महाराज होते. “देवळात जाऊ नका, मूर्तिपूजा करू नका, सावकाराचे कर्ज काढू नका, अडाणी राहू नका, चमत्कार असल्या गोष्टींवर विश्वास ठेवू नका.” अशी शिकवण आयुष्यभर त्यांनी लोकांना दिली.
माणसात देव शोधणाऱ्या या संताने लोकांनी दिलेल्या देणग्यांतील पैशांतून रंजल्या-गांजल्या, अनाथ लोकांसाठी महाराष्ट्रात ठिकठिकाणी धर्मशाळा, अनाथालये व विद्यालये सुरू केली. गोरगरिबांनी आपले मुले शिकविले पाहिजे तरच त्यांचा उद्धार होईल ही मोलाची शिकवण त्यांनी आपल्या कीर्तनातून समाजास दिली या कार्यक्रमास राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रमाधिकारी प्रा.बाबासाहेब भुकतरे,प्रा. अक्षय हासेवाड, प्रा.मो.अतिफोद्दीन,प्रा.शेख नजीर,प्रा.पुष्पा क्षीरसागर,प्रा. स्मिता कोंडेवार,प्रा.फर्जना बेगम प्रा.सय्यद फराज,मोहम्मद मोहसिन,सुफियान यांची प्रमुख उपस्थिती होती.