Uncategorized
भारतरत्न डॉ. मौलाना अब्दुल कलाम आझाद साहेब यांच्या स्मृतिदिनानिमित्त परभणी जिल्हा काँग्रेस कमिटी अल्पसंख्याक विभाग तर्फे आदरांजली
परभणी तालुका अल्पसंख्याक विभाग मध्ये नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांची नेमणूक
परभणी-(परभणी जिल्हा प्रतिनिधी): परभणी भारतरत्न डॉ. मौलाना अब्दुल कलाम आझादयांच्या स्मृतिदिनानिमित्त परभणी जिल्हा काँग्रेस कमिटी अल्पसंख्याक विभाग कडून आदरांजली अर्पण करण्यात आली. राजीव भवन परभणी जिल्हा काँग्रेस कमिटी शनिवार बाजार येथे हा कार्यक्रम पार पडला अध्यक्षस्थानी माननीय बाळासाहेब देशमुख ,उपाध्यक्ष महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी हे होते तर प्रमुख उपस्थितीमध्ये परभणी शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नदींमजी इनामदार, मा. मिन्हाज कादरी जिल्हाध्यक्ष अल्पसंख्याक विभाग काँग्रेस, ज्येष्ठ नेते खदिर लाला हाश्मी ,
डॉक्टर फारुक शेख परभणी तालुका अध्यक्ष काँग्रेस अल्पसंख्याक विभाग, अभय देशमुख माजी सरचिटणीस म.प्रदेश युवक काँग्रेस, सुहास पंडित सरचिटणीस महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी मीडिया विभाग, दिगंबर खरवडे माजी तालुका उपाध्यक्ष परभणी काँग्रेस, अब्दुल सइद अहमद परभणी जिल्हा उपाध्यक्ष युवक काँग्रेस, शेख स्माईल सय्यद करीम हे होते.
कार्यक्रमाचे अध्यक्ष बाळासाहेब देशमुख यांनी आपले मनोगत व्यक्त करताना डॉ.मौलाना अब्दुल कलाम आझाद यांनी भारतीय स्वतंत्र संग्राम मधील त्यांचे योगदान व स्वतंत्र भारताच्या शैक्षणिक व सांस्कृतिक क्षेत्राला नवी
दिशा देणाऱ्यांमध्ये मौलाना आझाद यांचा समावेश होता , त्यांचे राहणीमान व आचार विचार आदर्श होते भारताला ‘दारुल अमन’ म्हणजे ‘जागतिक शांततेची भूमी’ बनविण्याचे स्वप्न पाहणाऱ्या आझादचं आज स्मरण दिन असे म्हणले.तर अल्पसंख्याक अध्यक्ष मिनाज कादरी यांनी आपले मनोगत बोलताना धर्म, समाज आणि हिंदू मुस्लिम एकतेच्या क्षेत्रात मौलाना आझादानी उल्लेखनीय कार्य केले आहे राष्ट्रीय एकात्मता हा त्यांचा जिव्हाळ्याचा विषय होता हिंदू -मुस्लिम एकतेवरील त्यांचा विचार नेहमी बोलले जातात ते म्हणजे मार्च 1940 मध्ये काँग्रेसच्या रामगढच्या एका अधिवेशनात दिलेल्या भाषणात आझाद म्हणतात “स्वराज्य आणि हिंदू-मुस्लिम एकता या दोन्ही पैकी एकाची निवड करायची झाल्यास मी हिंदू- मुस्लिम ऐक्याची निवड करेल कारण स्वराज्य प्राप्त करण्यास विलंब झाला तर माझ्या देशाचे नुकसान होईल, पण हिंदू -मुस्लिम ऐक्य साध्य झालं नाही तर सबंध मानव जातीचे नुकसान होईल आणि ते मी कदापि सहन करू शकणार नाही” मौलाना आझाद यांनी हयातभर हिंदू- मुस्लिम ऐक्याचा पुढाकार केला.
तसेच या कार्यक्रमांमध्ये अल्पसंख्यांक विभाग परभणी तालुका स्तरावर काही पदाधिकारी नेमण्यात आले त्यामध्ये शेख फारुक शेख इस्माईल यांची तालुकाध्यक्षपदी , सय्यद करीम सय्यद कालू भाई यांची तालुका उपाध्यक्षपदी, शेख इस्माईल शेख रजाक यांची तालुका उपाध्यक्षपदी, सय्यद जिलानी सय्यद शब्बीर यांची तालुका उपाध्यक्षपदी, मुजबिर चांद पाशा कुरेशी तालुका उपाध्यक्षपदी, शेख असलम शेख सरवर यांची तालुका सहसचिव, शेख अब्बास शेख तहसील यांची तालुका सचिव पदी, शेख कमिम शेख साहेब शाह यांची तालुका सहसचिव पदी, शेख युनूस शेख साहेब लाल यांची तालुका सहसचिव पदी, सय्यद जैनुद्दीन सय्यद मुस्तफा यांची तालुका सहसचिव पदी, शेख खाजा शेख दस्तगीर यांची तालुका सहसचिव पदी, शेख रशीद शेख बाबा मिया यांची तालुका सहसचिव पदी तर कार्यकारणी सहसचिव पदी सय्यद शाहिद सय्यद रहीम यांची निवड करण्यात आली. तसेच काँग्रेसचे पदाधिकारी कार्यकर्ते हे बहुसंख्येने हजर होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शेख इस्माईल यांनी केले तर आभार वैजनाथ देवकते यांनी मानले