जिला

जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांच्या हस्ते मुख्य शासकीय समारोहात ध्वजारोहण

भारतीय प्रजासत्ताक दिनाचा 73 वा वर्धापन दिन उत्साहात साजरा
नांदेड, दि. 26 :- भारतीय प्रजासत्ताक दिनाचा 73 वा वर्धापन दिनाचा मुख्य शासकीय समारोह मोठ्या उत्साहात येथील श्री छत्रपती शिवाजी महाराज पोलीस कवायत मैदानावर साजरा करण्यात आला. जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांच्या हस्ते यावेळी ध्वजारोहण करण्यात आले. त्यांच्या समवेत जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकुर-घुगे, जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे, मनपा आयुक्त डॉ. सुनिल लहाने व वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
ध्वजारोहण व ध्वजवंदनानंतर शहीद सुधाकर राजेंद्र शिंदे यांच्या वीरपत्नी श्रीमती सुधा शिंदे यांना जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय पुणे यांच्याकडून प्राप्त ताम्रपट व पुष्पगुच्छ देऊन गौरव करण्यात आला. याचबरोबर सुभेदार पोतगंते दत्ता मारुती यांना ऑपरेशन रक्षकमध्ये कर्तव्य बजावत असतेवेळी अपंगत्व प्राप्त झाले असल्यामुळे त्यांना ताम्रपट देण्यात आला. याचबरोबर ए. आर. पवार, फयाज यांचा प्रशस्तीपत्र देऊन गौरव करण्यात आला.
राज्यस्तरीय गुणवत्ता यादीमध्ये नांदेड जिल्ह्यातील शिवेंद्रराज पाटील, अरुण लिंगदळे, अजित मुंढे, स्पर्श शिप्परकर, तन्वी कौठेकर, अदित्य मोग्गावार, निनाद बरडे, आर्यन पाटील, आरुष शेरीकर, वेदांत मोतेवार, श्लोक लढ्ढा, संचित बोरगावे, काव्या इंगळे, अश्मित कौशल्ये, मुकुंद भुतडा, प्रत्युशकुमार, महतो सर्वेश वाघमारे, सदाशीव केशराळे, सुघोष काब्दे, ओवी साधून, सार्थक पेठकर, श्रिया टेंभुर्णे, नंदकिशोर बसवदे, अनय पांडे, राजनंदिनी हिवराळे, ओमकार सैदमवार, जय पतंगे, कौस्तुभ देशपांडे, कौस्तुभ जाधव, प्रहर्ष चुंचूवार यांना शिष्यवृत्ती मिळाल्या निमित्त पुरस्कार वितरीत केले.
यावेळी जिल्हा परिषद शाळा वडेपुरीच्या विद्यार्थ्यांनी सायबर अवेरनेसवर पथनाट्य सादर केले. सगरोळी येथील सैनिक शाळेच्या विद्यार्थ्यांनी कवायतीचे प्रात्यक्षिक सादर केले. यावेळी राष्ट्रध्वजास मानवंदना व राष्ट्रगीतानंतर जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी संचलन करणाऱ्या पथकाचे पोलीस वाहनातून निरीक्षक केले. उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन सांगळे यांच्या नेतृत्वाखाली पथसंचलनात केंद्रीय राखीव पोलीसबल, सशस्त्र पोलीस पथक, सशस्त्र महिला पोलीस पथक, वाहतुक पोलीस शाखा पथक, गृहरक्षक दलाचे पुरूष व महिला पथक, महाराष्ट्र सुरक्षा बल पथक, राष्ट्रीय छात्रसेना, सैनिकी शाळा, स्काऊट पथक, स्टुडंट पोलीस कॅडेड, पोलीस बॅन्ड पथक, डॉग स्काड,मार्क्स मॅन वाहन, बॉम्ब शोधक व नाशक पथक, वज्र वाहन, बुलेट रायडर, आपदा मित्र, मिनी रेस्क्यू फायर टेंडर, कृषि विभाग चित्ररथ, पोलीस विभाग मोटर सायकल पेट्रोलींग या प्लाटूनी पथसंचलनात सहभाग घेतला.

Munawar Khan

या पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो नांदेड न्यायालयांतर्गत राहील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button