मराठवाडा

संतोष बांगर यांच्या दादागिरीमुळे मुख्यमंत्री शिंदे नाराज, न बोलता कारचं दारच लावून घेतलं

मुंबई, 25 जानेवारी : शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर यांनी पुन्हा एकदा एका प्राचार्याला मारहाण प्रकरणामुळे वादात अडकले आहे. दुसऱ्यांदा हा प्रकार घडल्यामुळे संताप व्यक्त केला जात आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सुद्धा नाराज झाले असून यावर बोलण्याचं टाळलं. शिवसेनेचे शिंदे गटात गेलेले आमदार संतोष बांगर यांची दादागिरी सुरूच आहे. संतोष बांगर यांनी शासकीय तंत्रनिकेतनच्या प्राचार्यांनाच मारहाण केली असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. याबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विचारले असता त्यांनी सोड सोड नको ते असं म्हणून बोलण्याचं टाळलं.

संतोष बांगर यांच्या प्रकरणावर मुख्यमंत्र्यांनी एका प्रकारे नाराजीच बोलून दाखवली आहे.

तसंच, दिल्लीमध्ये ऊस उद्योगासंदर्भात अतिशय महत्त्वाची बैठक केंद्रीय मंत्री अमित शहा यांच्या उपस्थित पार पडली. राज्यात आपलं सरकार आल्यापासून केंद्रातून मदत मिळत आहे. या अर्थसंकल्पीय अधिवेशनात केंद्राकडून सहकार्य मिळेल, असं एकनाथ शिंदे म्हणाले.
महाराष्ट्रात आपली परंपरा राहिली आहे. एखाद्या जागेवर एखाद्या सदस्याचं निधन होतं तेव्हा सगळेजण सहकार्य करतात आणि ती निवडणूक बिनविरोध होते याचं उदाहरण आपण मुंबईत पाहिलं आहे, पोटनिवडणुका बिनविरोध झाल्या पाहिजे, असं आवाहनही शिंदेंनी केलं.

‘अमित शहा यांच्यासोबत बैठक झाली आहे. अतिशय सकारात्मक चर्चा झाली आहे.

त्यांनी सहकार क्षेत्राबाबत चर्चा केली. ऊस उत्पादानाबाबत ही बैठक होती. ऊस क्षेत्र हे मोठे आहे, येणााऱ्या अडचणी असतील, ऊस उद्योगाला चालणा देण्यासाठी चर्चा झाली आहे. या बैठकीमुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे’ असं आश्वासनही शिंदेंनी दिलं.

Munawar Khan

या पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो नांदेड न्यायालयांतर्गत राहील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button