जिला

विकास कामाच्या स्थगितीतून खा. चिखलीकरांनी मुख्यमंत्र्याना तोंडघशी पाडले – माजी आ. राजूरकर

तत्कालीन पालकमंत्री अशोकराव चव्हाण यांनी शहरवासीयांना मूलभूत सुविधा उपलब्द व्हाव्यात यासाठी महाविकास आघाडी सरकारच्या माध्यमातून ‘मूलभूत सुविधा’ या सदराखाली १५० कोटींचा निधी मंजूर करून घेतला होता. यातील बहुतांश कामांना प्रारंभ झाला होता यातून नांदेडकरांत आनंदाचे वातावरण होते मात्र नाट्यमय घडामोडीत राज्यात सरकार बदलले या परिस्थितीत खा. प्रताप चिखलीकरांनी या कामास गती देणे अपेक्षित असतांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना चुकीची माहिती व स्थगितीचा अट्टहास यातून प्रारंभ झालेल्या या विकास कामास स्थगिती मिळवली होती. शासनाच्या स्थगिती निर्णयास मुंबई उच्च न्यायालयाच्याऔरंगाबाद खंडपीठात आव्हान देण्यात आले होते .यावर दिलेल्या निकालात विद्यमान शासनाचा निर्णय बेकायदा, मनमानी व लहरी असल्याचे निरीक्षण नोंदवून निधी वितरणाच्या निर्णयास स्थगिती दिली आहे. खा. प्रताप चिखलीकरांचा विकास कामास विरोध व अट्टहास यातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना तोंडघशी पाडण्यात आल्याचा आरोप काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष ,माजी आ. अमरनाथ राजूरकर यांनी केला आहे.

Munawar Khan

या पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो नांदेड न्यायालयांतर्गत राहील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button