जिला

सोनारी फाटा पासून ते जवळगाव कमानी पर्यंत काम करणाऱ्या ठेकेदारच्या निकृष्ट कामाची चौकशी करून ठेकेदाराचे नाव काळ्या यादीत टाकावी

हिमायतनगर, सोनारी फाटा पासून ते जवळगाव कमानी पर्यंत डांबरीकरण, सिमेंटीकरण व पुलाचे काम करणाऱ्या ठेकेदारच्या निकृष्ट कामाची चौकशी करून ठेकेदाराचे नाव काळ्या यादीत टाकावी अशी मागणी राम गुंडेकर यांनी केली. याचे वृत्त प्रकाशित होताच कार्यकारी अभियंता श्री कोरे यांनी सदरील कामाची चौकशी करून कार्यवाहीचा अहवाल सादर लावावा असे पत्र हिमायतनगर येथील उपकार्यकारी अभियंता डी.एन.तुंगेनवार याना पाठविले आहे. यामुळे ठेकेदारच्या बोगस कामाचे पिटले उघडे होईल अशी अपेक्षा तक्रारकर्त्यानी व्यक्त केली आहे.
हिमायतनगर तालुक्यातील सोनारी फाटा पासून ते जवळगाव कमानी पर्यंत डांबरीकरण, सिमेंटीकरण व पुलाचे काम रस्त्यासाठी सिआरफ योजनेतुन २६३ वर अंदाजीत साढे कोटी रुपयाचा निधी मंजूर करण्यात आला होता. सदरचे काम करतांना अंदाज पत्रकाला बगल देऊन विशाल कंस्ट्रक्शन कंपनी हदगाव काम करीत असल्याने पुलाला तडे गेले आहेत. यासह सिमेंटीकरण रस्त्याच्या कामात मोठ्या प्रमाणात अनियमित्ता झाली आहे.
सध्याच्या  घडीला सिमेंट रस्त्याचे काम सुरू असून नाल्याची रेती, सिमेंटचे कमी प्रमाण, कमी साईजचा गज तोही सिमेंट रस्ता करतांना लावला जात नाही. एका मिक्सरच्या यंत्रात पसतीस पोते सिमेंट वापरण्याचे असतांना केवळ पंचवीस पोते वापरला जात असल्याचे लक्षात येते आहे. तसेच झालेल्या डांबरीकरणच्या रस्त्यातही मोठ्या प्रमाणात अनियमित्ता असून एका लेव्हलने रस्ता नसल्याने ऊस वाहतुक करणारी अवजड वाहने ये जा करताना एका बाजूला झोके देत वाहने चालत असल्याने इतर वाहनाला ती वाहने जाईपर्यंत बाजूला थांबावी लागत आहेत.
रस्त्याचे झालेले खोदकाम, टाकण्यात आलेला भराव, डांबरी कोट, रेल्वे भुयारी मार्गा जवळील सिमेंट रस्ता सर्व कामांची अंदाज पत्रका प्रमाणे चौकशी करून निकृष्ट नियमबाह्य काम करणाऱ्या विशाल कंस्ट्रक्शन कंपनीचे नाव काळ्या यादीत टाकावे, अन्यथा लोकशाही मार्गाचा अवलंब करून आमरण उपोषण करण्यात येईल. अशा निकृष्ट कामामुळे रस्त्याची काही दिवसातच खड्डे होणार असून, ठाकुर यांचे शेताजवळ झालेल्या पुलाला तडे गेले आहेत. पुलाची भिंत फोडुन पुन्हा करण्याचे उपअभियंता तुंगेनवार यांनी सांगितले असतांना अभियंता पोपुलवार गुत्तेदाराशी संगनमत करून सिमेंट पुसून घेतला असल्याचे तक्रारीत शिवसैनिक राम गुंडेकर यांनी नमूद केले होते.
याबाबतचे वृत्त नांदेड न्यूज लाईव्हने प्रकाशित करताच कार्यकारी अभियंता श्री कोरे यांनी या रस्त्याच्या कामाची चौकशी करण्याचे आदेश अभियंता तुंगेनवार याना दिले आहे. या कामाच्या चौकशी नियमाप्रमाणे होऊन ठेकेदारावर कार्यवाही होईल कि नेहमीप्रमाणे या कामात माया घेऊन चौकशी अधिकारी प्रकरणावर पडदा टाकतील का…? याकडे विकास प्रेमी जनतेचे लक्ष लागून आहे.
या रस्त्याच्या कामाची देखरेख करणारे अभियंता पोपुलवार यांनी ठेकेदाराकडून निकृष्ट काम होत असताना जाणीवपूर्वक दुर्लक्ष का केले याचीही चौकशी होणे गरजेचे असून, अश्या भ्रष्ट अभियंत्यामुळे हिमायतनगर तालुक्यातील विकास कामाचा दर्जा ढासळला आहे. त्यामुळे अश्या अभियंत्याच्या अखत्यारित सुरु असलेल्या इतर कामाची देखील चौकशी व्हावी आणि त्यांना कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी निलाम्बीत करावे अशी मागणीही केली जात आहे.

Munawar Khan

या पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो नांदेड न्यायालयांतर्गत राहील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button