महाराष्ट्रा

‘शिवशक्ती-भीमशक्ती एकत्र’, शिवसेना-वंचितच्या युतीचा मुहूर्त ठरला!

मुंबई, 22 जानेवारी : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि वंचित बहुजन आघाडीच्या युतीचा मुहूर्त अखेर ठरला आहे. उद्या म्हणजेच 23 जानेवारीला बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त शिवसेना-वंचित बहुजन आघाडीच्या युतीची घोषणा होईल, असं शिवसेना नेते सुभाष देसाई म्हणाले आहेत.
दोन मोठे पक्ष एकत्र येत असताना मोठी प्रक्रिया असते, चर्चा करावी लागते. मनातून सगळं ठरलं आहे, असं सुभाष देसाई म्हणाले आहेत. प्रकाश आंबेडकर काय म्हणाले? दरम्यान शिवसेना-वंचित यांची युती कधी होणार? याबाबत प्रकाश आंबेडकर यांनाही विचारण्यात आलं.

शिवसेना आणि आमच्यात युतीबाबत बोलणी झाली आहेत. उद्धव ठाकरेंनी युतीची घोषणा करावी, अशी आमची भूमिका आहे. आमच्या युतीबाबत ठाकरे गट काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत सध्या चर्चा करत आहे. सर्वंनी एकत्र मिळून युतीची घोषणा करावी असं उद्धव ठाकरे यांना वाटत असल्याचं प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलं आहे.

काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसने आम्हाला नाकारलेलं होतं. परंतु आम्ही त्यांना नाकारलेलं नाही, आम्ही केवळ दलितांपुरत मर्यादित राहावं अशी काँग्रेस, राष्ट्रवादीची भूमिका आहे, ती आम्हाला मान्य नसल्याचं प्रकाश आंबेडकर यांनी स्पष्ट केलं आहे.

Munawar Khan

या पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो नांदेड न्यायालयांतर्गत राहील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button