म्हणून आम्ही एकत्र आलो, उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले
ज्या एका स्वप्नाची महाराष्ट्राची जनता वाट पाहत होती, त्याबद्दलचा निर्णय घेण्यासाठी आम्ही दादरच्या वास्तूमध्ये एकत्र आलो आहे. आंबेडकर आणि ठाकरे या नावाला एक विचार आहे, एक पार्श्वभूमी होती. माझे आजोबा प्रबोधनकार ठाकरे आणि आंबेडकर हे समकालीन होते. समाजातील रूढी परंपरावर त्यांनी काम केलं आहे.
आज राजकारणामध्ये ज्या काही चाली, परंपरा सुरू आहे. त्या मोडून टाकण्यासाठी दोन्ही वारसादार पुढे आले आहे, असं यावेळी उद्धव ठाकरे म्हणाले. देश प्रथम हा शब्द वापराला जात आहे. देशात एक भ्रम पसरवला जात आहे.
लोकांना भ्रमात ठेवून हुकुमशाही लादली जात असते. त्याच वैचारिक प्रदुषणातून लोकांना मोकळं करण्यासाठी, राज्यघटनेसाठी आम्ही एकत्र आलो आहेत, असंही उद्धव ठाकरे म्हणाले. पुढे राजकीय काय वाटचाल असेल, पुढे काय करायचं आहे, हे त्या त्या वेळी आम्ही एकत्र येऊन निर्णय घेऊ.
बाळासाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आम्ही एकत्र आलो आहे, याची घोषणा केली आहे, आता निवडणुकीमध्ये बदलाचे राजकारण सुरू होईल. जाहीरनाम्यामध्ये मंडल आयोग हे आम्ही लागू करू अशी घोषणा होती. दुर्दैवाने त्यावेळी होऊ शकले नाही. गेली अनेक वर्ष उपेक्षितांचे राजकारण झाले आहे, यासाठी आम्ही चळवळ सुरू केली.
पण ही चळवळ गिळण्याचा प्रयत्न झाला. आम्ही लढत राहिलो. उमेदवार निवडून येणे हे पक्षाच्या हातात नसून लोकांच्या हातात आहे. त्याला उमेदवारी देणे हे पक्षाचे काम आहे, असं यावेळी प्रकाश आंबेडकर म्हणाले.
नातेवाईकांचे राजकारण जसे वाढत गेले, तसे महाराष्ट्रात गरिबांचे राजकारण बाजूला पडले. भांडवलशाही आणि लुटारूचे राजकारण सुरू झाले आहे. एकेकाळी अर्थव्यवस्थेमध्ये मोठाल्या उद्योगांची गरज होती. पण शेतीची प्रक्रिया करणारे उद्योग याची आपण चर्चा करत नाही.
आमच्यासोबत येतील अशी अपेक्षा बाळगतो, असं म्हणत आंबेडकर यांनी राष्ट्रवादीच्या वादावर प्रतिक्रिया दिली. ‘आज ईडीच्या मार्फत देशातील राजकीय नेतृत्व संपवले जात आहे. त्याने खरंच पैसे खाले असेल तर त्याला जेलमध्ये घेऊन जा, कोर्ट त्याला शिक्षा देईल. पण कोर्टात जायचं नाही आणि फक्त नेतृत्वावर जो आक्षेप आहे, प्रतिमा डागळण्याचा जो भाग आहे.
तो हा धोकादायक प्रकार आहे, आपण काय अमरपट्टा घेऊन आलो नाही. एक दिवस नरेंद्र मोदी यांचा सुद्धा अंत होणार आहे. त्यांनी सुद्धा त्यांच्या पक्षात लिडरशीप संपवली आहे. वरती कुणालाच येऊ दिलं नाही, अशी टीकाही आंबेडकर यांनी केली.
तेव्हा आम्ही तिन्ही पक्ष एकत्र आलो, आमच्यावर अनेक आरोप झाले. पण आम्ही सगळ्या आरोपांना उत्तरं दिली. आम्ही अडीच वर्ष सरकार चालवून दाखवलो. महाविकास आघाडीमध्ये मित्रपक्षांचे हित सांभाळायचे, जर आपण एकत्र आलो नाही तर व्यक्तिरित्या काही फायदा होणार नाही. दोन पक्ष एकत्र आले आणि कुणी महाविकास आघाडीत बिघाडी झाली असं म्हटलं तर हे देश प्रथम या हेतूला तडा जातो. आपण महाविकास आघाडीमध्ये आला आहात. घटक पक्ष म्हणून वाटचाल कराल याला कुणाचा हरकत नाही, असंही उद्धव ठाकरे म्हणाले.