मराठवाडा

‘बाथरूमला जाऊ द्या’ दारुडा ACP रात्री शिरला लोकांच्या घरात, औरंगाबादमधील घटना

रंगाबाद, 15 जानेवारी : औरंगाबाद शहरामध्ये पोलिसांची मान शरमेनं घालवणारे कृत्य एका पोलीस अधिकाऱ्याने केलं आहे. दारूच्या नशेत या पोलिसांनी एका महिलेच्या घरात घुसून धिंगाणा घातला.
त्यामुळे संतापलेल्या लोकांनी एसीपीला पोलिसांच्या हवाली केलं. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी या पोलिसावर कारवाईची मागणी केली. मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील एका उच्चभ्रू परिसरात शनिवारी मध्यरात्री ही घटना घडली आहे. एसीपी विशाल धुमे असं या अधिकाऱ्याचे नाव आहे.

दारूच्या नशेत तर्राट झालेला विशाल धुमे याला काही सुधरत नव्हते. त्याने एका घरात घुसण्याचा प्रयत्न केला आणि मला घरातलं बाथरूम वापरू द्या, अशी मागणीच केली. एवढ्या रात्री दारूच्या नशेत एक पोलीस अधिकारी दारावर आल्यामुळे घरातील सदस्य घाबरून गेले. त्यांनी या विशाल धुमेला इथून जाण्यास सांगितले.

पण, दारूच्या नशेत टूल असलेल्या या अधिकाऱ्याने अरेरावी सुरू केली. त्यामुळे या परिसरातील नागरिक गोळा झाले. त्यांनी आधी या अधिकाऱ्याची समजूत काढली पण तो काही ऐकायच्या मनस्थितीत नव्हता. त्याची अरेरावी सुरूच होती.

अखेर संतापलेल्या नागरिकांनी पोलिसांना घटनेची माहिती देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन एसीपी धुमेला ताब्यात घेतले. दरम्यान, विरोधी पक्षनेते अंबादास दानवे आज सकाळी पोलीस ठाण्यात दाखल झाले. या पोलिसाने घरातील सदस्यांना मारहाण केल्याचा आरोप त्यांनी केला.

‘मला सकाळी काही कार्यकर्त्यांनी फोन केला होता.
एसीपी धुमाळे नावाच्या या पोलीस अधिकाऱ्याने दारूच्या नशेत घरात घुसला होता. जर कुंपनच शेत खात असेल तर ते चुकीचे आहे. पोलीस हे कायद्याचे रक्षक आहे. याबद्दल तक्रार झाली आहे. रात्री 2 ते अडीच वाजेच्या सुमारास ही घटना घडली आहे. त्यामुळे पोलीस अधिकारी असं वागत असेल तर अशा प्रवृतीचे जागीच खच्चीकरण झाले पाहिजे, अशी मागणी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केली.

Munawar Khan

या पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो नांदेड न्यायालयांतर्गत राहील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button