स्पोर्ट्स
राष्ट्रीय इंडियाका कप स्परधेचे यशस्वीरीत्या संपन्न तर महाराष्ट्र संघास विजेतेपद
दिनांक सहा ते आठ जानेवारी 2023 रोजी श्री गुरूगोविंदसिंघजी स्टेडियम नवीन इनडोर हॉल नांदेड महाराष्ट्र येथे पहिल्या राष्ट्रीय इंडियाका कप 2022-23 स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी उद्घाटक म्हणून स्कॉलर पब्लिक स्कूलचे संचालक प्राध्यापक रवींद्र रेड्डी सर यांच्या शुभहस्ते राष्ट्रीय इंडियाका कप स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले या प्रसंगी इंडियाका असोसिएशन ऑफ इंडिया चे अध्यक्ष मा. दया चंद भोला है कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून उपस्थित होते तर प्रमुख पाहुणे म्हणून राज्यसंघटनेचे अध्यक्ष रुपेश पाडमुख नागार्जुना पब्लिक प्रदीप पवार, सरदार जगजीवनसिंघ रीसालदार, हरिदास बकवाड आदी उपस्थित होते. स्कूल
या स्पर्धत उत्तरप्रदेश, जम्मू काश्मीर, केरळ, छत्तीसगड, महाराष्ट्र, तेलंगणा, रजेस्थान, मध्यप्रदेश, अशा विविध राज्यातून 250 खेडूनी सहभाग नोंदविला होता
या स्पर्धेचे बक्षीस वितरण अध्यक्ष मा. दया चंद भोला छत्तीसगड इंदियकका चे अध्यक्ष लखणसिंह शाहू राज्य संघटनेचे अध्यक्ष रुपेश पाडमुख उपाध्यक्ष प्रवीणकुमार कुपटिकर आदी मान्यवर यांच्या हस्ते करण्यात आले होते
या स्पर्धेचे विजेतेपद महाराष्ट्र संघास तर उपविजेतेपद छत्तीसगड व तृतिय स्थानावर उत्तरप्रदेश संघास मिळाले या वेळी तांत्रिक समिती चे प्रमुख कमलेश देवांग यांनी काम पाहिले
या स्पर्धा यशस्वी करण्यासाठी राज्य संघटनेचे सचिव रविकुमार बकवाड यांच्या मार्गदशनाखाली सुहास कांबळे, शुभम पाडदे, विशाल कांबळे, प्रतीक बजरंग गुंतापल्ले, योगेश चंबोले, सोनटक्के, श्रीराम कदम, अरहांत पाईकराव, विनोद भंडारे, अनिकेत सारपाते, सुशांत ठाकूर, अभिनव दुधमल, सुमेध गायकवाड ईश्वर नांदेडकर, अभिजीत खेडकर, आदींनी स्पर्धा यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले