मराठवाडा

परभणी शहर म.न.पा. आयुक्त तृप्ती सांडभारे यांची तात्काळ हकालपट्टी करा. – भीमशक्ती

 

परभणी आज दि.22/7/2024 भीमशक्ती जिल्हा संघटनेच्या वतीने मनपा आयुक्त तृप्ती सांडभोर यांच्या मनमानी कारभारा विरोधात निवेदन देण्यात आले..!
एकीकडे शासन स्वच्छ भारतच्या नावाखाली परभणी जिल्ह्याला लाखो करोडोंचा निधी देत असून दुसरीकडे मनपा आयुक्त, तृप्ती सांडभोर या मनमानी कारभार करत आहेत. त्यांच्या या आडमुठे पणामुळे घंटा गाड्या बंद असल्यामुळे शहरामध्ये ठिकठिकाणी कचऱ्यांचे ढिग लागले आहेत. तसेच वस्त्या वस्त्यांमधील नाल्यांचे घाण पाणी हे रस्त्यावर येत आहे त्यामुळे घाणीचे साम्राज्य वाढत चालले असून सर्वत्र परभणी शहरात डेंगू नावाचा संसर्गजन्य रोग झपाट्याने वाढत आहे व याच धरतीवर डेंगुच्या तापाने एका २३ वर्षीय तरूणाचा बळी घेतला आहे. अशा प्रकारे जाणुन बूजून माणसाच्या जीवनाशी खेळणाऱ्या कर्तव्यभ्रष्ट मनपा आयुक्त तृप्ती सांडभोर यांची तात्काळ हकालपट्टी करून परभणी शहराला आजार मुक्त करावे.

तसेच गेल्या दोन वर्षा पासून मनपा आयुक्त यांनी मनमानी करून नविन घरपट्टी देणे बंद केले आहे. त्यामुळे स्लम वस्तीतील नागरीकांना घरकुल घेण्यास अडथळा निर्माण होत आहे. परभणी शहरामध्ये एकीकडे अनधिकृत बांधकामाचा ऊत आला आहे.तसेच दुसरीकडे गोरगरीब जनता शासनाच्या योजनेच्या लाभा पासुन वंचित रहावी यासाठी जाणूनबुजून जातीय द्वेषातुन घरपट्टी बंदचा निर्णय घेतला आहे..

गेल्या दोन वर्षा पासुन बंद केलेल्या नविन घरपट्टया चालू कराव्यात जेणे करून गरीबांना घरकुलाचा लाभ घेता येईल. तसेच परभणीची बकाल व भकास अवस्था करणाऱ्या मनपा आयुक्त तृप्ती सांडभोर यांची तात्काळ हकालपट्टी करावी अन्यथा भीमशक्ती संघटनेच्या वतीने जन आंदोलन उभारण्यात येईल. अशा मागण्यांचे निवेदन परभणी जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले.. असा इशारा देण्यात आला आहे.. याप्रसंगी भीमशक्तीचे राज्य उपाध्यक्ष विजयकुमार सुखदेव, राज्य सरचिटणीस रवी सोनकांबळे, म.महासचिव प्रवीण कणकुटे, म.उपाध्यक्ष चक्रवर्ती वाघमारे, जिल्हाध्यक्ष सतीश भिसे, जिल्हा प्रवक्ते सुहास पंडित, तातेराव वाकळे, शहराध्यक्ष विक्रम काळे, ता.अध्यक्ष राहुल कणकुटे, संजय वाव्हळे, दीपक कणकुटे, बबन वाव्हळे, अनिल सूर्यवंशी, सुरेश यादव आदी उपस्थित होत

Munawar Khan

या पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो नांदेड न्यायालयांतर्गत राहील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button