स्काऊट गाईड कार्यालयाच्या वतीने बिगिनर्स कोर्स व उजळणी वर्गाचे तालुका निहाय आयोजन
नांदेड भारत स्काऊट्स आणि गाईड्स जिल्हा कार्यालयाच्या वतीने दरवर्षीप्रमाणे सन 2024-25 या शैक्षणिक वर्षांसाठी स्काऊट गाईड विषया संदर्भात तालुका निहाय बिगीनर्स कोर्स/ उजळणी वर्गाचे आयोजन करण्यात आलेले आहे. दिनांक 16-07-2024 पासून या उजळणी वर्गाची सुरुवात लोहा तालुक्यापासून होत आहे. या उजळणी वर्गामध्ये स्काऊट गाईड विषयाची ऑनलाइन व ऑफलाइन पथक नोंदणी करणे, अभ्यासक्रमाबाबत मार्गदर्शन, राज्य व राष्ट्रपती पुरस्कार तसेच पंतप्रधान ढाल स्पर्धा, समुदाय विकास कार्यक्रम,संघनायक शिबीर इत्यादी बाबत मार्गदर्शन करण्यात येणार आहे.
या उजळणी वर्गासाठी मार्गदर्शक म्हणून शिक्षणाधिकारी प्राथमिक व माध्यमिक,संबंधित तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी, स्काऊट गाईड कार्यालयाचे जिल्हा संघटक स्काऊट /गाईड, जिल्हा प्रशिक्षण आयुक्त स्काऊट/ गाईड जिल्हा आयुक्त स्का/गा, ALT/H.W.B शिक्षक यांचे मार्गदर्शन लाभणार आहे. शाळा तेथे कब बुलबुल स्काऊट गाईड पथक सुरू करण्याच्या दृष्टीने परिपत्रकात नमूद केल्याप्रमाणे प्रत्येक तालुक्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या तारखेला सकाळी 11 ते 4 या वेळेत दिलेल्या ठिकाणी जिल्ह्यातील सर्व माध्यमाच्या शाळांमधून एक शिक्षक /शिक्षिका किंवा स्काऊट गाईड विषयाचे शिक्षक यांनी उपस्थित राहण्यासाठी पाठविण्यात यावेत असे आवाहन शिक्षणाधिकारी(प्राथमिक/माध्यमिक) जिल्हा परिषद नांदेड यांनी केले आहे.