शहर

प्रत्येक स्टॉलवर लोकराज्य अंक उपलब्ध विद्यार्थी, अभ्यासक व शाळांनी मागणी करावी


नांदेड, दि. 27 :- राज्य शासनाचे मुखपत्र असलेले लोकराज्य हे शासकीय योजना व महत्वाची माहिती देणारे मासिक आहे. स्पर्धा परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना अत्यंत उपयुक्त असलेले लोकराज्य नव्या जोमाने प्रसिध्द होणार असून प्रत्येक विद्यार्थ्यांनी, अभ्यासक, लेखक व सर्व क्षेत्रातील मान्यवरांनी आपला अंक राखून ठेवावा , असे आवाहन जिल्हा माहिती अधिकारी प्रवीण टाके यांनी केले आहे.
आज पहाटे नांदेड जिल्ह्यातील वृत्तपत्र वितरण संघटनेच्या पदाधिकाऱ्यांशी त्यांनी संवाद साधला. यावेळी महाराष्ट्र राज्य वृत्तपत्र विक्रेता संघाचे कार्याध्यक्ष तथा नांदेड जिल्ह्याचे अध्यक्ष बालाजी पवार, राज्य संघटनेचे कार्यकारी सदस्य चंद्रकांत घाटोळ, उपाध्यक्ष गणेश वडगावकर, कोषाध्यक्ष बाबू जल्देवार सह पदाधिकारी व वृत्तपत्र विक्रेते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

लोकराज्यचा अंक प्रत्येक स्टॉलवर उपलब्ध केल्यास विद्यार्थ्यांना सहज खरेदी करणे शक्य होवून उपलब्ध होईल. यासाठी सर्व वितरकांनी आपल्या स्टॉलवर लोकराज्य अंक विक्रीसाठी ठेवावा,असे आवाहन जिल्हा माहिती अधिकारी प्रवीण टाके यांनी केले.
लोकराज्य हे मासिक सर्वासाठी उपयोगी असून यात राज्य शासनाने घेतलेले धैयधोरणे, सर्व सामान्यांसाठी घेतलेले निर्णय, मंत्रिमंडळातील निर्णय, विशेष प्रसंगावर आधारित विशेषांकात सखोल माहिती असलेले लेख,पर्यटनावरील माहिती अशा अनेक विषयावर आधारित माहितीचा संग्रह खात्रीशीर आकडेवारीसह प्रसिध्द करण्यात येतो. जुलै महिन्याचा विशेष अंक राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्यावरील विशेषांक आहे.

या मासिकाची वार्षिक वर्गणी फक्त 100 रुपये असून या वर्गणीमध्ये वर्षभर 12 अंक वर्गणीदारांना त्यांनी दिलेल्या पत्त्यावर पाठविण्यात येतो. वर्गणी भरण्यासाठी आता आपल्या घरी येणाऱ्या वृत्तपत्र विक्रेत्यांकडे देखील वर्गणी दिली जाऊ शकते. शहरातील प्रमुख बुक स्टॉलवर हे अंक उपलब्ध असतील. तसेच जिल्हा माहिती कार्यालयात कार्यालयीन वेळेमध्ये अंक नोंदणीसाठी संपर्क साधला जाऊ शकतो.
कार्यालयाशी संपर्क साधाया कार्यालयाशी संपर्क साधावा लागेल. या कार्यालयाचा पत्ता-जिल्हा माहिती अधिकारी, जिल्हा माहिती कार्यालय, पार्वती निवास, खुरसाळे हॉस्पिटल, यात्री निवास रोड, बडपुरा नांदेड असा आहे. अधिक माहितीसाठी लोकराज्य समन्वयक काशिनाथ आरेवार (मो. क्र. मोबाईल नंबर 9422350213 यावरही संपर्क साधता येईल.

प्रमुख स्टॉलवर उपलब्ध
तसेच नांदेड जिल्ह्यातील प्रत्येक स्टॉलवर हा अंक आता फक्त 10 रुपयांस मिळणार असून वार्षिक वर्गणी भरून वर्गणीदार होण्यासाठी या कार्यालयात येवून 100 रुपये वर्गणी भरावी लागेल. या 100 रुपयांची शासकीय पावतीही वर्गणीदारांना मिळणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली. आतापर्यत अनेक मोठया पदावर कार्यरत असलेल्या अधिकाऱ्यांनी स्पर्धा परीक्षा देताना लोकराज्यचा अंक नियमित वाचत असल्याचे त्यांच्या अनुभवात नमुद केलेले आहे.
तुमच्या वृत्तपत्र विक्रेत्याला घरपोच लोकराज्य मागा !
नांदेड जिल्ह्यातील वृत्तपत्र विक्रेत्यांनी लोकराज्य घराघरात पोहोचवण्याचा संकल्प केला आहे. केवळ शंभर रुपयांच्या वर्गणीमध्ये वर्षभर अंक घरपोच येऊ शकतो.आपल्या घरी वृत्तपत्र टाकणाऱ्या विक्रेत्याकडे शंभर रुपयाची पावती घेऊन आपली नोंद करू शकता. आपल्या विक्रेत्याकडे आपल्यापर्यंत अंक पोहोचवले जाईल, असे आवाहन वृत्तपत्र विक्री संघटनेचे अध्यक्ष बालाजी पवार यांनी केले आहे. घरपोच अंकासाठी चंद्रकांत घाटोळ ( मो.क्र. 7020345110) यांच्याशी संपर्क साधावा.

Munawar Khan

या पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो नांदेड न्यायालयांतर्गत राहील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button