जिला
जिल्हा परिषदेत राजर्षी शाहू महाराज जयंती साजरी
नांदेड,26- नांदेड जिल्हा परिषदेत आज राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली. जिल्हा परिषदेच्या कॉन्फरन्स हॉलमध्ये हा कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी जिल्हा परिषदेच्या प्रशासक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल यांच्या हस्ते शाहू महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी उप मुख्य कार्यकारी अधिकारी राजकुमार मुक्कावार यांच्यासह जिल्हा परिषदेचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.