जिला

26 जून सामाजिक न्याय दिन स्काऊट गाईड कार्यालयाच्या वतीने साजरा.

26 जून सामाजिक न्याय दिन म्हणून स्काउट गाईड कार्यालयाच्या साजरा आज साजरा करण्यात आला .यावेळी पावडेवाडी नाका नांदेड येथे असलेल्या छत्रपती शाहू महाराजांच्या पुतळ्यास स्काऊट गाइड विभागाच्या वतीने समाज कल्याण अधिकारी,श्री सत्येंद्र आऊलवार यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून प्रतिमा पूजन करण्यात आले. त्याचबरोबर समता दिंडीमध्ये स्काऊट गाईड सहभागी झाले होते. यावेळी उपस्थित सर्व स्काऊट गाईडने सामाजिक न्याय दिनाच्या विविध घोषणा देखील दिल्या.

तसेच आज आमलि पदार्थ सेवन विरोधी दिनाच्या निमिताने आम्ली पदार्थ सेवन न करण्याची शपथ देखील स्काऊट गाईड ना देण्यात आलि. यावेळी महात्मा फुले हायस्कूल विजय नगर तसेच रमामाता मुलींचे हायस्कूल येथील स्काऊट आणि गाईड या कार्यक्रमात सहभागी झाले होते.यावेळी स्काऊट गाईड कार्यालयाच्या जिल्हा प्रशिक्षण आयुक्त,श्रीमती भागीरथी बच्चेवार, श्री रमेश फुलारी, जिल्हा संघटक स्काऊट श्री जनार्दन इरले, जिल्हा संघटक गाईड श्रीमती शिवकाशी तांडे, मुख्याध्यापक श्री वलांडिकर, स्काऊट मास्टर श्री विश्वासराव, श्रीमती वाढे, श्री राहुल चंदेल आदि उपस्थित होते

Munawar Khan

या पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो नांदेड न्यायालयांतर्गत राहील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button