जिला

नवदिक्षीत धम्मचाऱ्यांचा नांदेड येथे स्वागत समारोहाचे आयोजन

 

नांदेड, २० जून येथील त्रिरत्न बौद्ध महासंघाच्या धम्मचारी झालेल्या नवनियुक्त धम्मचऱ्यांचा नांदेड येथे रविवार दिनांक २३ जून रोजी स्वागत व सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. वैशाली नगर नांदेड येथील दीपंकर कुंज बुद्ध विहारात सकाळी ११ वाजता हा कार्यक्रम होणार आहे. पुणे येथे बौद्ध धम्माचे आचरण करणाऱ्यांना धम्मचारी पदाची एका सोहळ्यात दिक्षा देण्यात आली. यामध्ये नवदीक्षित झालेले नांदेडचे तीन धम्मचाऱ्यांचा समावेश आहे.

त्यांचा येत्या २३ जून रोजी सत्कार करण्यात येणार आहे. या प्रसंगी बौद्ध धम्माचे गाढे अभ्यासक धम्मचारी-अनागरिक चंद्रबोधी यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. त्रिरत्न बौद्ध महासंघात धम्मचारी होण्यासाठी विशिष्ट धम्म प्रशिक्षण, धम्माचा अभ्यास आणि आचरण तसेच नियमित ध्यान साधना, त्रिरत्न बौद्ध महासंघात सक्रिय सहभाग, धम्म प्रशिक्षणाचे आयोजन व मार्गदर्शन या पायऱ्या पूर्ण कराव्या लागतात. त्यानंतरच अशा साधकांना धम्मचारी म्हणून दीक्षा दिली जाते. या नव-धम्म प्रचारकास धम्मचारी म्हणून दिक्षा देतांना नवीन नाव दिले जाते. त्यानंतर त्यांना धम्माचा प्रचार व प्रचार करण्याची जबाबदारी देण्यात येते.

नांदेड येथील नगदीदीक्षित झालेले धम्मचारी विद्याघोष (मिलिंद लोखंडे), धम्मचारी वज्रघोष (विजय डोंगरे) व धम्मचारी मंगलबोधी (एम.आर. दंडे) या नवदिक्षित धम्मचारींचा नांदेड येथे स्वागत व सत्कार करण्यात येणार आहे. या कार्यक्रमास जिल्ह्यातील बंधू-भगिंनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन त्रिरत्न बौध्द महासंघाचे चेअरमन पद्मगर्भ, धम्मचारी पद्मसेन, सर्व धम्मचारी गण व त्रिरत्न बौद्ध महासंघाच्यावतीने करण्यात आले आहे.

Munawar Khan

या पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो नांदेड न्यायालयांतर्गत राहील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button