जिल्हा परिषदे अंतर्गत सर्व कार्यालयात दर महिन्यात एक दिवस स्वच्छता मोहिम मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल यांची माहिती
नांदेड, 20 जून- जिल्हा परिषद अंतर्गत सर्व कार्यालयात शाश्वत स्वच्छता रहावी यासाठी स्वच्छता मोहिमेचा विशेष उपक्रम हाती घेण्यात आल्याची माहिती नांदेड जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल यांनी दिली आहे.
सर्व कार्यालयात स्वच्छता असने आवश्यक आहे. यासाठी दर महिन्याच्या 25 तारखेला जिल्हा परिषदेसह जिल्ह्यातील सर्व पंचायत समित्या, ग्रामपंचायत, शाळा, आंगणवाडी, प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्र, पशुवैद्यकीय दवाखाने व जिल्हा परिषदे अंतर्गत तालुका स्तरावरील सर्व कार्यालयात स्वच्छता अभियान राबविण्यात येणार आहे.
या उपक्रमात या सर्व कार्यालय व कार्यालय परिसराची संपूर्ण स्वच्छता करणे, कचरा व्यवस्थापन प्रणाली अधिक प्रभावी करणे, शौचालये आणि स्वच्छतागृह नियमित स्वच्छता सुनिश्चित करणे, स्वच्छतेच्या बाबतीत कर्मचाऱ्यांमध्ये जागरूकता निर्माण करणे, पर्यावरणपूरक साधनांचा वापर वाढविणे आदी बाबींचा समावेश असल्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल यांनी सांगीतले.
या उपक्रमातात स्वतः मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल यांच्यासह सर्व विभाग प्रमुख, पंचायत समिती स्तरावर गट विकास अधिकारी, सर्व अधिकारी सहभागी होणार आहेत. दर महिन्याच्या 25 तारखेला स्वच्छता मोहिम राबविण्यात येणार आहे. 25 तारखेला सुटी असेल तर आदल्या दिवसी किंवा दुस-या दिवसी स्वच्छता मोहिम राबवली जाईल. सर्व अधिकारी व कर्मचा-यांच्या सहकार्याने ही स्वच्छता मोहीम यशस्वी होईल आणि त्यामुळे कार्यालयीन वातावरण सुधारेल तसेच कार्यक्षमतेतही वाढ होईल असा विश्वास मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल यांनी व्यक्त केला.