क्राईम

13 संशईत मोबाईल (चोरी / गहाळ) सह एका अरोपीस ताब्यात घेतले 

 

 

नांदेड/ 06- बसस्थानक व रेल्वेस्थानक परीसरामध्ये मोबाईल चोरीच्या घडत असलेल्या घटनेच्या अनुषंगाने मा. श्री. श्रीकृष्ण कोकाटे, पोलीस अधिक्षक, नांदेड, मा. श्री. अविनाश कुमार, अपर पोलीस अधिक्षक, नांदेड, मा. श्री. किरितिका सी.एम. सहा. पोलीस अधीक्षक, उप विभाग, नांदेड शहर, यांनी गुन्हे शोध पथकाचे अधिकारी व अंमलदार यांना अभिलेखावरील गुन्हेगार व त्यांच्या हालाचालींवर लक्ष ठेऊन जास्तीत जास्त मोबाईल चोरीचे गुन्हेगारांना अटक करुन गुन्हे उघडकीस आणण्याबाबतच्या सुचना दिल्या आहेत.

मागील काही दिवसात बसस्थानक व रेल्वेस्टेशन परीसरा मधुन मोबाईल फोन चोरीस / गहाळ होत असल्याबाबतच्या तक्रार येत असल्याने मा. श्री. किरितिका सी.एम. सहा. पोलीस अधीक्षक, उप विभाग, नांदेड शहर, व परमेश्वर कदम, पोलीस निरीक्षक, पोलीस ठाणे वजीराबाद, नांदेड यांचे मार्गदर्शनाखाली वजीराबाद पोलीस स्टेशन येथील गुन्हे शोध पथकाचे अधिकारी आर. डी. वटाणे, सपोनि, पोहेकॉ दत्तराम जाधव, पोहेकॉ मनोज परदेशी, पोना/शरदचंद्र चावरे, पोकॉ शेख ईम्रान शेख एजाज, पोकों/ बालाजी कदम, पोकॉ रमेश सुर्यवंशी, पोकॉ/ 14 भाऊसाहेब राठोड, पोकॉ/329 मेघराज पुरी, हे मोबाईल चोरटयांचा शोध घेणेकामी अभिलेखवरील गुन्हेगारांच्या हालचालीवर लक्ष ठेऊन होते.

दिनांक 04.06.2024 रोजी गुप्त बातमीदार यांचेकडुन माहीती मिळाली की, चौधरी पेट्रोलपंपाचे बाजुस तारा पान शॉप समोर डोक्याला लांब केस असलेला व शर्टीग केलेला इसम उभा असुन त्याचेकडे बरेच मोबाईल फोन आहेत तो लोंकांना सदरचे मोबाईल फोन विक्री करती आहे अशी खात्रीशीर माहीती मिळाली. त्यामाहीती वरुन वर नमुद पोलीस अधिकारी व अमलदार यांनी मिळालेल्या माहीतीचे ठिकाणी जावुन सदर वर्णनाचे ईसमास ताब्यात घेवुन त्याचे नाव गाव विचारले असता त्यांनी त्याचे नाव अरुण रामदास श्रीमंगले, वय 36 वर्षे व्यवसाय हेअरकटींग सलुन राहणार जागृत हनुमान मंदीर काबरा नगर नांदेड ता.जि. नांदेड त्याचे थैलीची झडती घेतली असता त्याचे थैली मध्ये एकुण (13) संशईत मोबाईल (चोरीचे/गहाळ) किमंती 1,34,000/- रुपयाचे मिळुन आल्याने सपोनी आर.डी. वटाणे यांनी पोलीस ठाणे वजिराबाद पोलीस एन.सी. क्रमांक 112/2024 कलम 124 महाराष्ट्र पोलीस अधिनियम प्रमाणे कायदेशीर तक्रार दिली आहे.

सदर इसमाकडे मोबाईलबाबत अधिक विचारपुस करता तो समाधान कारत उत्तरदे देत नसल्या कारणाने व सदर मोबाईल धारकांचे तक्रारी अगर गाहाळ बाबत नोंदी तपासुन पुढील अधिक चौकशी कामी पोहेकॉ/152 मनोज परदेशी यांचे कडे देण्यात आला तसचे चौकशी दरम्यान संबधाने चोरीच अगर गहाळची तक्रार अढळुन आल्यास पुढील कादशीर कार्यवाही करण्याची तजविज ठेवली आहे.

गुन्हे शोध पथक वजीराबादचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केलेल्या कामगिरीबाबत वरीष्ठांनी त्यांचे कौतुक केले आहे.

Munawar Khan

या पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो नांदेड न्यायालयांतर्गत राहील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button