हिमायतनगर पत्रकार संघाच्या वतीने वृत्तपत्र सृष्टीचे जनक ‘बाळशास्ञी जांभेकर’ याना अभिवादन
अवैद्य धंदे अजूनही चालू आहेत हे बंद झाले पाहिजे यासाठी पत्रकारांनी लिखाण करावे – अशोक अनगुलवार
हिमायतनगर,अनिल मादसवार| पत्रकारांनी सामाजिक बांधिलकी जोपासून सर्वसामान्य जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी पत्रकारिता करावी असे आवाहन जेष्ठ पत्रकार तथा दैनिक लोकमतचे तालुका प्रतिनिधी अशोक अनगुलवार यांनी केले. ते हिमायतनगर शहरातील उत्कर्ष फोटो गैलरी येथे आयोजित करण्यात आलेल्या बाळशास्त्री जांभेकर यांनी सुरु केलेल्या ‘दर्पण दिन’ निमित्ताने उपस्थित पत्रकारांना मार्गदर्शन करताना बोलत होते.
मराठी वृत्तपत्र सृष्टीचे जनक ‘दर्पणकार बाळशास्ञी जांभेकर’ यांनी दि.६ जानेवारी १८३२ रोजी ‘दर्पण’ हे मराठीतील पहिले नियतकालिक सुरु करुन मराठी पञकारितेची मुहूर्तमेढ रोवली होती. त्यांचे स्मरणात आजचा हा दिवस सर्वञ ‘दर्पण दिन, आणि त्यांची जयंती “पञकार दिन’ म्हणून साजरा केला जातो. याच दिनाचे औचित्य साधून ‘दर्पणकार बाळशास्ञी जांभेकर’ यांच्या कर्तव्यतत्परेला उजाळा देण्यासाठी हिमायतनगर येथील नांदेड न्यूज लाईव्ह कार्यालयात जेष्ठ पत्रकार तथा दैनिंक सकाळचे बातमीदार प्रकाश जैन यांच्या अध्यक्षतेखाली पत्रकार दिन आयोजित करण्यात आला होता. सर्वप्रथम दर्पणकार बाळशास्ञी जांभेकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून पूजन करण्यात आले.
यावेळी पुढे बोलतांना अशोक अंगुलवार म्हणाले कि, बाळशास्त्री जांभेकर, डॉ.बाबासाहेब आंबेडकर, लोकमान्य टिळक यांनी पारतंत्र्याच्या काळात सक्षम, निर्भीडपणे जनतेच्या समस्या मांडून तत्कालीन शासनाच्या विरोधात धारधार पत्रकारिता करून महाराष्ट्राला दिशा देण्याचे काम केले. तसेच लोकांच्या सुख दुखत सहभागी होऊन लोकांना न्याय मिळवून दिला. कुठल्याही गोष्टीची परवा नं करता जे सत्य आहे तेच लिहिण्याचे काम केले. त्यांचा वारसा आपण सर्व पत्रकारांनी अखंडपणे चालू राहावा रस्ताही हिमायतनगर तालुक्यातील राजकीय, समाजी, शैक्षणिक व अन्य समस्या समोर आणून जनतेला न्याय दिला पाहिजे.
तालुक्यात विशेषतः जे जुगार, मटका, दारू सारखे अवैद्य धंदे अजूनही चालू आहेत. हे सर्व बंद झाले पाहिजे गोरगरिबांना न्याय मिळवून देण्यासाठी अन्यायाच्या विरोधात कठेही तडजोड नं करता समाजाच्या न्याय हक्कासाठी लेखणीचा वापर करावा. असे आवाहन त्यांनी उपस्थित पत्रकार बांधवाना केलं. यावेळी जेष्ठ पत्रकार प्रकाश जैन, अशोक अनगुलवार, अनिल मादसवार, सोपान बोम्पीलवार, ज्ञानेश्वर पंदलवाड, शुद्धोधन हनवते, दिलीप शिंदे, मनोज पाटील, मारोती वाडेकर, दाऊं गाडगेवाड, दत्ता पोपुलवार, अनिल नाईक, श्रीनिवास बोम्पीलवार, उत्कर्ष मादसवार आदींसह अनेक पत्रकार व छायाचित्रकार उपस्थित होते.