क्राईम

सकाळी वॉकींग करणारे इसमांचे मोबाईल चोरी करणारे तिन आरोपी मुद्देमालासह ताब्यात

 

नांदेड जिल्हयात सकाळी वॉकीग करणारे इसमांचे मोबाईल हिसकावण्याचे गुन्हयाचे प्रमाण वाढल्याने या प्रकारचे गुन्हे करणारे गुन्हेगार यांचा शोध करणेकामी मा. पोलीस अधिक्षक श्री कोकाटे साहेब यांनी स्थानीक गुन्हे शाखा नांदेड येथील पोलीस निरीक्षक यांना आदेश दिले होते.

स्थानीक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री उदय खंडेराय यांनी त्यांचे शाखेतील सपोनि श्री रवी वाहुळे व पोउपनि श्री आनंद बिचेवार यांची टिम तयार करुन नांदेड शहरातील सकाळी वाँकींग करणारे इसमांचे मोबाईल हिसकावून चोरी करणारे गुन्हेगार यांचा शोध घेवुन गुन्हे उघडकीस आनण्याच्या सुचना दिल्या होत्या. दिनांक 26/05/2024 रोजी सपोनि श्री रवि वाहुळे व पोउपनि आनंद बिचेवार यांचे टिमला नांदेड शहरात माली गुन्हयातील आरोपीचा शोध करुन नांदेड शहरात जबरी चोरी करणारे गुन्हेगारावर कार्यवाही करण्याचे आदेश देवुन रवाना केले होते.

श्री रवी वाहुळे सपोनि स्थागुशा यांचे टिम ने नांदेड शहरातील गोपनिय माहीतगार यांचे कडुन माहीती घेवुन इसम नामे 1. अब्दुल मुजीब पि. अब्दुल हमीद वय 45 वर्षे रा. खडकपुरा नांदेड 2. शेख इरफान पि.शेख इस्माईल वय 36 वर्षे रा.दुलेशहा रहेमान नगर यांना ताब्यात घेवुन त्यांचे कडुन दोन मोबाईल किमती 20,000/- रुपयाचे जप्त केले. सदरचे मोबाईल हे पो.स्टे. नांदेड ग्रा. गुरन 110/2023 कलम 394,34 भादवी गुन्हयातील असल्याने त्यांना नांदेड ग्रामीन येथे पुढील तपास कामी देण्यात आले आहे.

तसेच श्री आनंद बिचेवार पोउपनि स्थागुशा यांचे टिम ने नांदेड शहरातील गोपनीय माहीतगार यांचे कडुन माहीती घेवुन नांदेड शहरात सकाळी जबरी चोरी करुन मोबाईल लुटनारे टोळी मधील एक इसम नामे वैभव महेंद्र सुर्यतळे वय 19 वर्षे रा. काबरानगर नांदेड यास ताब्यात घेवुन त्यांचे कडुन एकुण 13 मोबाईल किंमती 2,72,000/- रुपये किमतीचे व गुन्हयात वापरलेली स्कुटी किंमती अंदाजे 50,000/- रुपयाचा असा एकुण 3,22,000/- रुपयाचे मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. त्याचे कडुन पो.स्टे. वजिराबाद गुरन 237/2024 कलम 392,34 भादवी व 238/2024 कलम 379,34 भादवी, पो.स्टे. भाग्यनगर गुरन 219/2024 कलम 392,34 भादवी व गुरन 222/2024 कलम 392,34 भादवी असे गुन्हे उघड झालेले असुन इतर मोबाईलचे गुन्हे बाबत तपास चालु असुन सदर आरोपीस पो.स्टे. वजिराबाद येथे पुढील तपास कामी हजर केले आहे.

सदरची कार्यवाही ही मा. श्रीकृष्ण कोकाटे, पोलीस अधीक्षक नांदेड, श्री अबिनाश कुमार, अपर पोलीस अधीक्षक नांदेड, श्री खंडेराव धरणे, अपर पोलीस अधिक्षक भोकर यांचे मार्गदर्शनाखाली, श्री उदय खंडेराय, पोलीस निरीक्षक स्थागुशा, सपोनि श्री रवी वाहुळे, पोउपनि श्री आनंद बिचेवार, पोलीस अमलदार माधव केंद्रे, गंगाधर कदम, गुंडेराव करले, संजीव जिंकलवाड, दिपक पवार, महेश बडगु, रंनधिरसिंह राजबंशी, गजानन बयनवाड, देवा चव्हाण, ज्वालासिंघ बावरी, मोतीराम पवार, तानाजी येळगे, मारोती मोरे, व चालक मारोती मुंडे, हेमंत बिचकेवार, शंकर केंद्रे सायबर सेलचे पोउपनि श्री गंगाप्रसाद दळवी, अमलदार दिपक ओढणे, राजु सिटीकर यांनी पार पाडली असून सदर पथकाचे मा. पोलीस अधीक्षक यांनी कौतूक केले आहे.

Munawar Khan

या पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो नांदेड न्यायालयांतर्गत राहील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button