क्राईम

नांदेड जिल्हयात गुन्हेगाराच्या टोळ्या करुन गुन्हे करणारे 70 इसम नांदेड जिल्हयातुन हद्दपार, 14 स्थानबध्द

 

मा. श्री श्रीकृष्ण कोकाटे, पोलीस अधीक्षक, नांदेड यांनी नांदेड जिल्हयातील वारंवार गुन्हे करणारे, सराईत गुन्हेगार, लपुन छपुन अवैध्य धंदे करणारे इसमांविरुध्द प्रतिबंधात्मक कार्यवाही करण्याचे आदेश दिले होते.

नांदेड जिल्हयातील गुन्हेगारावर वारंवार प्रतिबंधात्मक कार्यवाही करुन सुध्दा त्यांचे वर्तणात सुधारणा होत नसल्याने नांदेड जिल्हयातील सर्व पोलीस ठाणेकडुन त्यांचे हद्यीतील सराईत गुन्हेगारांना स्थानबध्द करण्यासंबंधाने 30 MPDA प्रस्ताव पाठविण्यात आले होते. तसेच महाराष्ट्र पोलीस अधिनियमाचे विविध कलमन्वये 179 प्रस्ताव पाठविण्यात आले होते. नमुद प्रस्ताववर कार्यवाही चालु आहे.

पोलीस ठाणे अर्धापुर यांचेकडुन कलम 55 महाराष्ट्र पोलीस अधिनियम अन्वये पाठविण्यात आलेल्या प्रस्तावमध्ये इसम नामे 1) सुरेंद्रसिंग ऊर्फ सुरज जगतसिंग गाडीवाले वय 22 वर्ष रा नंदीग्राम सोसायटी नांदेड 2) जसप्रितसिंग ऊर्फ यश गेदासिंग कामठेकर वय 23 वर्ष रा नंदीग्राम सोसायटी नांदेड 3) शुभम राजकुमार खेलगुडे वय 24 वर्ष रा. बंदाघाट नांदेड 4) शरनपालसिंग गुरमितसिंग रागी वय 26 वर्ष रा. गुरुव्दारा गेट नंबर 4 नांदेड 5) जसलोकसिंघ नवनिहालसिंघ कारीगीर वय 20 वर्ष रा यात्रीनिवास नांदेड यांना एक वर्ष कालावधी साठी नांदेड जिल्हयातुन हद्दपार केले बाबतचे आदेश व पोलीस ठाणे विमानतळ यांचेकडुन कलम 55 महाराष्ट्र पोलीस अधिनियम अन्वये पाठविण्यात आलेल्या प्रस्तावमध्ये इसम नामे 1) गुरुप्रितसिंग पि. गुलजारसिंग खैरा वय 44 वर्ष व्यवसाय चालक रा. दशमेशनगर, बाफना रोड, नांदेड 2) करणसिंग राजविरसिंग शाहु वय 32 वर्ष व्यवसाय खा. नौकरी रा. गुरुव्दारा गेट नंबर 3, नांदेड 3) सरहाण अली अलकेसरी वय 44 वर्ष व्यवसाय व्यापार रा. आरबगल्ली दरबार मस्जीदजवळ नांदेड यांना सहा महीणे कालावधीसाठी नांदेड जिल्हयातुन हद्दपार केले बाबतचे आदेश दिनांक 17/05/2024 रोजी मा. श्रीकृष्ण कोकाटे पोलीस अधीक्षक, नांदेड यांनी पारीत केले आहेत.

नांदेड जिल्हयात गुन्हेगाराच्या टोळया करुन गुन्हे करणारे इसमांविरुध्द कलम 55 महाराष्ट्र पोलीस अधिनियमान्वये प्रस्ताव पोलीस ठाणेकडुन पोलीस अधीक्षक, नांदेड यांचेकडे पाठविण्यात आले होते. मा. श्री श्रीकृष्ण कोकाटे, पोलीस अधीक्षक नांदेड यांनी कलम 55 महाराष्ट्र पोलीस अधिनियम अन्वये सन 2023-24 या कालावधीत नांदेड जिल्हयातील विविध 23 टोळ्यामधील 70 इसमांना नांदेड जिल्हयाचे बाहेर हद्दपार केले आहे. तसेच MPDA अंतर्गत 14 आरोपीतांना कारागृहामध्ये स्थानबध्द करण्यात आले आहे. आणखी नांदेड जिल्हयात टोळीने गुन्हे करणारे आरोपीतांविरुध्द प्रस्ताव पाठवुन त्यांना हद्दपार/स्थानबध्द करण्याची प्रक्रिया चालु आहे.

Munawar Khan

या पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो नांदेड न्यायालयांतर्गत राहील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button