जिला

वटफळी, बोरगाव,कांडली(बु) कांडली(खुर्द)या गावांचा महावितरणने विज पुरवठा प्रश्न सोडवा. सामाजीक कार्यकर्ता दिपक पाटील वटफळीकरची मागणी…

तालुका: प्रतिनिधी महावितरण आष्टी उपकेंद्रतुन कांडली फिडर ओव्हरलोड मुळे थ्री फेज विज पुरवठा मिळत नाही,रुद्राणी फिडर वर विज पुरवठा जोडून देण्यात यावा व चार गावांचा विजेचा प्रश्न सोडवावा अशी मागणी एका निवेदनाद्वारे कार्यकारी अभियंता साहेब महावितरण कार्यालय भोकर यांच्याकडे करण्यात आली आहे.देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, हदगाव विभागीय महावितरण अंतर्गत आष्टी उपकेंद्र तुन कांडली फिडर वर थ्री फेज विज पुरवठा ओव्हर लोड मुळे थ्री फेज विज पुरवठा मिळत नाही.

कांडली फिडर वर वटफळी,बोरगाव, कांडली(खुर्द) कांडली(बु) या गावातील सर्व शेतकऱ्यांना खरीप – रब्बीच्या हंगामात लागवड केलेल्या पिकांना सीजन मध्ये थ्री फेज विज पुरवठा एक दिवस आड करूंन विज पुरवठा मिळत असतो.दोन गावं आज दोन गावं उद्या असा वीज पुरवठा देण्यात येतो,खरीप व रब्बीच पीक पाणी उपलब्ध असून सुद्धा वीज पुरवठा दररोज मिळत नाही म्हणून पिक सुकतात शेतकऱ्यांचं नुकसान होत आहे. फिडर ओव्हरलोड मुळें कृषी पंप धारकांना व चार गावाला त्रास सहन करावा लागत आहे. म्हणून ग्राहकांचे म्हणणे आहे की रुद्राणी फिडर वर काही गावे जोडून देण्यात यावे ,रुद्राणी फिडर हा स्वतंत्र रुद्राणी इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड या एच टी ग्राहकासाठी होता.

परंतु सदर ग्राहक हा एक ते दीड वर्षापासून पी डी झाल्यामुळे सदर फिडर बंद आहे, आष्टी उपकेंद्रातून निघालेल्या रुद्राणी फिडर उच्चदाब वाहिनी वटफळी फाट्या पर्यंत बंद अवस्थेत आहे, त्यावर महावितरण ने आम्हाला वीज पुरवठा जोडून द्यावा,व कृषी पंप धारकांना वीज ग्राहकांना या विजेच्या लपंडावातून मुक्त करावे विज पुरवठा प्रश्न न सोडवल्यास ,लोकशाही मार्गाचा अवलंब करून महावितरण कंपनी विरोधात उपोषणा बसणार असल्याचेही त्यांनी निवेदनात म्हटले आहे.अशी मागणी अधीक्षक अभियंता महावितरण मंडळ कार्यालय नांदेड, कार्यकारी अभियंता महावितरण विभाग भोकर जि नांदेड यांच्याकडे सामाजीक कार्यकर्ते दिपक बाबुराव जाधव पाटील रा. वटफळी ता. हिमायतनगर जि नांदेड यांनी केली आहे

Munawar Khan

या पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो नांदेड न्यायालयांतर्गत राहील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button