Uncategorized

पोलीस स्टेशन भाग्यनगर, नांदेड हदीत 02 घर फोडी करणा-या सराईत आरोपीस अटक

 

नांदेड शहरात दिवसेंदिवस वाढत असलेल्या घरफोडीचे व चोरीचे घटनेत वाढ होत असल्याने सदरील गुन्हयावर प्रतिबंध व गुन्हे उघड करणेबाबत मा. श्री श्रीकृष्ण कोकाटे साहेब, पोलीस अधिक्षक, नांदेड. मा.श्री अबिनाश कुमार अपर पोलीस अधिक्षक नांदेड यांनी वेळोवेळी नांदेड शहरातील सर्व पोलीस स्टेशन प्रभारी अधिकारी यांना आदेशित केले होते. पोलीस निरीक्षक श्री रमेश वाघ पोलीस स्टेशन भाग्यनगर, नांदेड व प्रभारी श्री रामदास शेंडगे पोलीस निरीक्षक पोलीस स्टेशन भाग्यनगर, नांदेड बांनी पोलीस स्टेशनचे गुन्हे शोध पथकास मार्गदर्शन करुन घरफोडी व चोरीचे गुन्हयातील अज्ञात आरोपीचा शोध घेवून गुन्हे उघडकीस आणण्याबाबत वेळोवेळी सुचना व मार्गदर्शन केले. दिनांक 13.05.2024 रोजी पोलीस स्टेशन भाग्यनगर, नांदेड येथील गुन्हे शोध पथक हे

पेट्रोलोग करीत असतांना पो.उप नि.विनोद भा.देशमुख यांना गुप्त बातमीदारामार्फत माहीती मिळाली की. त्यांचे कडील गुन्हा क्रमांक 82/2024 कलम 454,457,380 भा.दं. वि. मधील आरोपी हे वसमत जि. हिंगोली येथील असुन ते सध्या मालेगाव ता. अर्धापुर जि. नांदेड येथील चौकामध्ये आहेत. तसेच त्यातील एक इसम हा शिख धर्माचा आहे अशी माहीती मिळाल्यात्यावरुन पो.उपनि. देशमुख व त्यांचेकडील गुन्हे शोध पथकातील अमंलदार पोहेकॉ/818 प्रदिप गर्दनमारे, पोहेकॉ/1098 गजानन किडे, पोहेकों/709 दिलीप राठोड, पोकॉ/710 ओमप्रकाश कवडे, पोकॉ/516 हनवता कदम व पोकॉ/157 सतिष कदम असे मालेगाव ता. अर्धापुर जि. नांदेड येथे जावुन तेथुन आरोपी नामे 1. रमेश सुरेश गायकवाड वय 34 वर्षे व्यवसाय मजुरी रा. गणेशपुर वसमत जि. हिंगोली. 2. सतनामसिंग पिता गुरुमुखसिंग चव्हाण वय 30 वर्षे व्यवसाय व्यापार रा. नवामोंढा वसमत जि. हिंगोली यांना ताब्यात घेवुन विचारपुस केली असता सदर आरोपीतांनी त्यांचा एक साथीदार संतराम ऊर्फे पिंटया रघुनाथ सरोदे रा.तलाब गल्ली अर्धापुर याचे मदतीने पोलीस स्टेशन भाग्यनगर, गु.र.नं. 82/2024 कलम 454,457,380 भा.दं. वि. व गु.र.नं. 138/2024 कलम 454,457,380 भा.दं.वि.हे दोन्ही गुन्हे केल्याची कबुली दिली असुन वरील 02 घरफोडीच्या गुन्हयातील एकुण 111 ग्रॅम सोने व इतर मुद्देमाल असा एकुण 5,40,000/-रुचा मुद्देमाल जप्त करुन चांगली कामगिरी केली.

सदरची कामगिरी मा.श्री श्रीकृष्ण कोकाटे साहेब, पोलीस अधिक्षक, नांदेड, मा. श्री अबिनाश कुमार, अपर पोलीस अधिक्षक, नांदेड, मा. श्रीमती किरितीका सी.एम. मॅडम, सहायक पोलीस अधिक्षक साहेब, उपविभाग, नांदेड शहर, नांदेड, पोलीस निरीक्षक श्री रमेश वाघ व प्रभारी पोलीस निरीक्षक रामदास शेंडगे यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकातील अधिकारी पो.उप नि.विनोद भा. देशमुख व पोलीस अमंलदार पोहेकॉ/709 दिलीप राठोड, पोहेकॉ/1098 गजानन किडे, पोहेकॉ/818 प्रदिप गर्दनमारे, पोकॉ/710 ओमप्रकाश कवडे, पोकॉ/516 हनवता कदम, पोकॉ/157 सतिष कदम पोलीस स्टेशन भाग्यनगर नांदेड व सायबर सेल येथील पोहेकॉ/1242 राजेंद्र सिटीकर यांनी पार पाडली आहे.

Munawar Khan

या पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो नांदेड न्यायालयांतर्गत राहील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button