जिला

पथदिवे लावले तरी कशाला? विजेचे खांब बनले शोभेचे वस्तू!

 

किनवट (अकरम चव्हाण ): पाच वर्षांपासून राष्ट्रीय महामार्गाचे काम सुरूच आहे. जेथे काम पूर्ण झाले, त्या आयेप्पा स्वामी मंदिर ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक दरम्यान डिव्हायडरच्या मधोमध विजेचे खांब उभे केले आहेत. त्यावर दिवे बसविण्यात आले असले, तरी अद्यापही वीजपुरवठा देण्यात आलेला नाही. यामुळे शहरात येणा्या प्रत्येक वाहनाला शहर आले की नाही, असा अनुभव येत आहे. महामार्गाचे काम पूर्ण होऊनही दिवे बंदच असल्याने किनवटला वालीच राहिला नाही, अशी चर्चा होत आहे.हे खांब व पथदिवे शोभेची वस्तू बनले आहेत. नांदेड-भोकर- हिमायतनगर-किनवट-माहूर-धनोडा या राष्ट्रीय महामार्ग क्र.161 ए चे कोठारी, किनवट ते माहूर धनोडा हे काम सुरू होऊन पाच वर्षांवर कालावधी झाला. माहूर ते किनवट कोठारीपर्यंत काम पूर्ण झाले. पण किनवट शहरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक ते जिजामाता चौक, अशोकस्तंभ या महामार्गाचे काम थांबूनच आहे. तसेच गोकुंदा ते ठाकरे चौकपर्यंत काम रखडलेले आहे. त्यामुळे या मार्गाने येणा्या जाणा्या वाटसरू व वाहनचालकांना धुळीचा सामना करावा लागत आहे. काम पूर्ण कधी होणार याकडे लक्ष लागले आहे.

जनरेटर लावून टेस्टिंग झाली, पण अडले तरी कुठे
वीजपुरवठा करण्याचे अडले तरी कुठे? हे न समजणारं कोडेच आहे. जनरेटर लावून टेस्टिंग झाली. नगरपालिकेच्या नावे मीटर घेऊन तो ताब्यात देण्यात येणार असल्याचे महामार्गाचे उपअ- भियंता यांनी अडीच महिन्यांपूर्वी सांगितले. पण कुठे अडले कळायला मार्ग नाही? आतातरी दिवे सुरू होतील का? असा प्रशन विचारला जात आहे. मिनी शहर असलेल्या गोकुंद्यात बपा महाविद्यालय व त्यापुढे 100 फूट रुंद महा- मार्गावर डिव्हायडर व विजेचे खांब नाहीत, याबाबत आशचर्य व्यक्त केले जात आहे

रस्ता अरुंद अन पथदिवेही बंदच
डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक ते आयेप्पा स्वामी मंदिर या महामार्गावर कुठे 100 भर फूट रुंद तर कुठे त्यापेक्षा कमी रुंद काम करून राष्ट्रीय महामार्ग विभागाने गुंडाळपट्टी केली. जिथे 30 मीटर रुंद महामार्ग करण्याला वाव होती, तीथेही कमी रुंदीचे काम केले. आयेप्पा स्वामी मंदिरापर्यंत विजेचे खांब उभे केले. पण ते पथदिवे अद्यापही सुरू झालेले नाहीत. त्यामुळे रात्री सर्वत्र अंधाराचे साम्राज्य आहे.

अशोक स्तंभ ते डॉ. आंबेडकर चौक हा शहरातील मुख्य रस्ता असून याच रस्त्यालगत न्यायदेवतेचे न्यायालय आहे परंतु रस्ता रुंदी करण्याच्या नावावर सदरील रस्त्याची दुरावस्था ही पाच वर्षापासून चालू असून संपूर्ण रस्त्याने खड्डे झाले . सदरील रस्ताचे रुंदीकरण होईल तेव्हा होईल परंतु आज स्थितीला रस्त्याची तात्काळ दुरुस्ती करण्यात यावी. अशी मागणी येथील नागरीकांनी करीत आहे.

Munawar Khan

या पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो नांदेड न्यायालयांतर्गत राहील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button