जिला

निम्न पैनगंगा प्रकल्पाचे काम धरण विरोधी संघर्ष समिती आज बंद पाडणार प्रकल्पाच्या बुडीत क्षेत्रातील वातावरण तापले

 

किनवट (अकरम चव्हाण)
विदर्भ व मराठवाड्यातील 95 गावांतील दीड लाख लोकांना देशोधडीला लावू पाहणाऱ्या निम्न पैनगंगा प्रकल्पाचे काम पाटबंधारे विभागाने दिनांक 3 मे‌ रोजी सूरू करताच ह्या प्रकल्पाच्या बुडीत क्षेत्रातील नागरिकांत भितीचे वातावरण निर्माण झाले असतानाच निम्न धरण विरोधी संघर्ष समिती व बुडीत क्षेत्रातील नागरिक संतप्त झाले आहेत. प्रकल्पाच्या मुख्य भिंतीचे व नदी पात्रातील रपट्याचे काम बंद पाडण्यासाठी दि. 6 मे सोमवारी धरण विरोधी संघर्ष समिती व नागरिक खंबाळा येथील धरण स्थळावर सकाळी नऊ वाजता धडकणार आहेत.
चलो खंबाळाची हाक संघर्ष समितीने सोशल मीडियावर पोस्ट टाकून व्हायरल केली आहे.त्यामुळे निम्न पैनगंगा प्रकल्प आता शासन प्रशासनाला चिंतेत टाकणार असल्याचे बोलले जात आहे.

गेल्या 27 वर्षांपूर्वी पैनगंगा नदीवर विदर्भ व मराठवाड्याच्या खंबाळा व खडका येथे निम्न पैनगंगा नदीवर हा प्रकल्प मंजूर झाला.मात्र या प्रकल्पाच्या मंजुरी पासूनच 95 गावातील जवळपास दीड लाख लोक विस्थापित होणार असल्याने तेंव्हापासून या प्रकल्पाला सर्व पक्षिय नेते व कार्यकर्ते यांनी धरण विरोधी संघर्ष समिती स्थापन करून टोकाचा विरोध सुरू केला आहे.
महाराष्ट्राच्या सत्तास्थानी बसणारे राजकीय पक्ष हा प्रकल्प पूर्णत्वास नेऊ पहात आहे तर धरणाला विरोध करणारे सत्ताधाऱ्यांचे मनसुबे उधळून लावत आहेत.

दिनांक १२ जुलै २००७ साली पाटबंधारे विभागाचे अधिकारी ह्या प्रकल्पाचे काम करण्यासाठी खंबाळा येथे आले असता तेंव्हाचे कार्यकारी अभियंता यांच्यावर धरण विरोधी संघर्ष समितीच्या पदाधिकाऱ्यांनी व बुडीत क्षेत्रातील नागरिकांनी हल्ला चढवला होता, त्याप्रकरणी धरण विरोधी नेत्यावर व शेतकऱ्यांवर प्राणघातक हल्ला व इतर कलमान्वये गुन्हे दाखल झाले होते.
प्रकल्पाच्या मुख्य भिंतीचे व नदी पात्रातील रपट्याचे चालू असलेले काम गैरकायदेशीर आहे.त्यामुळे ते काम बंद पाडायचे आहे जोपर्यंत खडका व खंबाळा आणि इतर गावातील ग्राम सभेने ज्या मागण्या केलेल्या आहेत.त्या मागण्या जोपर्यंत मान्य होत नाही तोपर्यंत धरणाचे काम सुरू करण्यात येऊ नये.तसेच आधी पुनर्वसन नंतर धरण या शासनाच्या नियमाप्रमाणे कोणत्याही गावाचे पुनर्वसन झालेले नसताना धरणाच्या कामाला सुरुवात करणे हे सुध्दा गैर कायदेशीर आहे. त्यामुळे खंबाळा येथे सुरू असलेले काम शांततेच्या मार्गाने,अहिंसेच्या मार्गाने अतिशय शिस्तबद्ध पध्दतीने बंद पाडायचे आहे.

अशी हाक निम्न पैनगंगा धरण विरोधी संघर्ष समितीने दिली आहे.
दिनांक 6 मे रोजी सकाळी नऊ वाजताच्या पूर्वी खंबाळा येथील धरण स्थळावर पोहचण्याबाबत धरण विरोधी संघर्ष समितीचे अध्यक्ष प्रल्हादराव पाटील जगताप, प्रसिद्धी प्रमुख तथा यवतमाळ जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष मुबारक तंवर,बंडुसिंग नाईक,विजय पाटील राऊत, डॉ.बाबा डाखोरे, प्रल्हादराव गावंडे सर,बाबुभाई फारूकी यांनी सोशल मीडियावर पोस्ट व्हायरल करून अवाहन केले आहे.
यावेळी धरण विरोधी संघर्ष समिती करा किंवा मरा या भुमीकेतून आंदोलनात उतरणार असल्याचे चित्र दिसून येत आहे.

Munawar Khan

या पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो नांदेड न्यायालयांतर्गत राहील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button