जिला

अखेर धरण विरोधी संघर्ष समितीने निम्न पैनगंगा प्रकल्पाचे काम बंद पाडले आचार संहिता असे पर्यंत प्रकल्पाचे काम सुरू होणार नाही.

 

किनवट (अकरम चव्हान)
निम्न पैनगंगा धरण विरोधी संघर्ष समिती विदर्भ मराठवाडा यांचा निम्न पैनगंगा प्रकल्पाला असलेला टोकाचा विरोध दुर्लक्षित करून पाटबंधारे विभागाने किनवट तालुक्यातील खंबाळा येथे धरणाच्या मुख्य भिंतीचे काम व खड्का ते खंबाळा नदीपात्रातून जोडणाऱ्या कच्च्या रपटयाचे काम दि.३ में रोजी सुरू केले असल्याची माहिती धरण विरोधी संघर्ष समितीच्या पदाधिकाऱ्यांना कळताच समितीने सोशल मीडियातून ६ मे‌ रोजी चलो खंबाळा ची हाक देताच शेकडो धरण विरोधी शेतकऱ्यांनी खंबाळा‌ येथे आज धडक देऊन धरणाचे काम बंद पाडले व संबंधित पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्याविरुद्ध रोष व्यक्त केला.

दोन राज्यांच्या आर्थिक तरतुदी मधून पैनगंगा नदीवर बांधण्यात
येणाऱ्या निम्न पैनगंगा प्रकल्प हा सुरवाती पासूनच वादात अडकला आहे.
विदर्भ पाटबंधारे विभागाकडून निम्न पैनगंगा प्रकल्पाचे
काम हाती घेण्यात आले आहे. बुडीत क्षेत्रातील ९५ गावांचा या महत्वकांक्षी प्रकल्पास तिव्र विरोध आहे. हा विषय न्याय प्रविष्ट आहे .तसेच निवडणूक आचारसंहिता लागू आहे, राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांनी किनवट व हिंगोली येथील लोकसभेच्या उमेदवारांच्या प्रचाराच्या वेळी निम्न पैनगंगा प्रकल्पाला जनतेचा विरोध असेल तर आचार संहिता संपल्यानंतर या संबंधाने बैठक घेण्याची घोषणा केली होती असे असतानाही
खंबाळा हद्दीत आचार संहिता संपन्यापूरवीच खोदकाम चालू करण्यात आले.
नदी पात्रात गिटटा, मुरूम व दगड टाकून रस्ता तयार करन्यात आला हे पाहून धरण विरोधी संघर्ष समितीने ६ मे सोमवार ला प्रकल्प स्थळी जमा होण्याचे आवाहन सोशल मीडियातून केले होते.

ठरल्याप्रमाणे सोमवारी सकाळीच धरणं विरोधी संघर्ष समितीचे पदाधिकारी व धरण विरोधी शेतकरी शेकडोच्या संख्येने प्रकल्प स्थळी जमा झाले. पैनगंगा हमारी माता है!
जनम जनम का नाता है!
सरकार हमसे‌ डरती‌ है
पोलीस को आगे करती‌ है
अशा घोषणा देत आंदोलन तीव्र करण्याचा इशारा दिला. यापूर्वी १२ जुलै २००७ साली धरण विरोधी संघर्ष समिती व धरण विरोधक शेतकऱ्यांच्या रोषाला सामोरे गेलेल्या पाटबंधारे विभागाच्या काही अधिकारी वर्गाची धिंड काढण्यात आली होती, ही पार्श्वभूमी लक्षात घेऊन आज खंबाळा येथे चार पोलिस स्टेशनच्या हद्दीतील फार मोठा पोलिस बंदोबस्त लावण्यात आला होता.

आक्रमक झालेल्या धरण विरोधकात व पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यात मांडवी पोलीस स्टेशनचे ठाणेदारांनी‌ मध्यस्थीची व महत्वाची भूमिका पार पाडली.आचार संहिता संपेपर्यंत प्रकल्पाचे काम बंदच राहणार असा तात्पुरता तोडगा काढण्यात आला. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून खंबाळा येथील प्रकल्प स्थळी किनवट तहसीलदार डॉ. शारदा चोंडेकर,गटविकास अधिकारी पुरूषोत्तम वैश्ननव, उपविभागीय पोलिस अधिकारी रामकृष्ण मळघने,नायब तहसीलदार विकास राठोड, सहा.अभियंता अनिकेत गुल्हाणे, मांडवी पोलीस स्टेशनचे ठाणेदार गफार शेख, सिंदखेड पोलीस स्टेशनचे ठाणेदार सुशांत किनगे आदी उपस्थित होते.

धरण विरोधकांचा कडवा विरोध बघता पाटबंधारे विभागाने प्रकल्पाचे काम बंद ठेवण्यात येईल असे जाहीर केले.
या प्रसंगी निम्न धरण विरोधी संघर्ष समितीचे अध्यक्ष प्रल्हादराव पाटील जगताप,धरण विरोधी संघर्ष समितीचे प्रसिद्ध प्रमुख तथा यवतमाळ जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष मुबारक तंवर,बंडुसिंग नाईक, प्रल्हादराव गावंडे सर,विजय पाटील राऊत, डॉ.बाबा डाखोरे‌, डॉ.सुप्रिया गावंडे,गुलाब मेश्राम, निलेश कुमरे, भगवतीप्रसाद तितरे‌, जयराम मिश्रा, डॉ.सुरेश तिवारी,विजय समगिर, उत्तम भेंडे, भास्कर जगताप, मंगेश सोयाम, आकाश वाघमारे ,राज गावंडे यांच्यासह शेकडो धरण विरोधक व शेतकरी उपस्थित होते.

Munawar Khan

या पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो नांदेड न्यायालयांतर्गत राहील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button