जिला

स्वयं सहाय्यता समुहातील महिला घेणार आज मतदानसाठी शपथ 1 लाख 85 हजार महिलांचा सहभाग

 

नांदेड,2- मतदान जनजागृतीसाठी जिल्हा प्रशासनाच्या वतीने विविध उपक्रम राबविण्यात येत असून आज बुधवार दिनांक 3 एप्रिल रोजी जिल्ह्यातील स्वयं सहाय्यता गटातील सुमारे 1 लाख 85 हजार महिला मतदान करण्यासाठी शपथ घेणार आहेत, अशी माहिती जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी तथा मतदान जनजागृती नोडल अधिकारी मिनल करनवाल यांनी दिली आहे. लोकशाहीच्या उत्साहात महिला मागे राहू नयेत यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी करनवाल ह्या जनजागृती करत आहेत.

 

जिल्हा ग्रामीण विकास विभागातंर्गत महाराष्ट्र ग्रामीण जिवनोन्नती अभियान अंतर्गत जिल्ह्यात 18 हजार 500 स्वंय सहाय्यता गट आहेत. त्या अंतर्गत 1 लाख 85 हजार महिला गावस्तरावर आज सकाळी 11 वाजता मतदान शपथ घेणार आहेत. या अनुषंगाने सर्व तालुका अभियान व्यवस्थापक, तालुका व्यवस्थापक, प्रभाग समन्वयक यांनी सदर कार्यक्रमाच्या दृष्टीने आपल्या स्तरावरून योग्य ते नियोजन करावे. तसेच मतदान शपथ मोहिमेत स्वयं सहाय्यता गटातील सदस्यांसह गावातील महिला व युवतींनी मोठ्या प्रमाणात सहभाग घ्यावा, असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करनवाल यांनी केले आहे.

Munawar Khan

या पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो नांदेड न्यायालयांतर्गत राहील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button