जिला
नांदेड जिल्हा परिषदेचा अर्थ संकल्प 5 मार्च रोजी सादर होणार
नांदेड,3- नांदेड जिल्हा परिषदेचा अर्थसंकल्प मंगळवार दिनांक 5 मार्च रोजी सादर केला जाणार आहे. जिल्हा परिषदेच्या प्रशासक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करनवाल यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी दुपारी एक वाजता अर्थसंकल्प सादर केला जाईल. जिल्हा परिषदेच्या स्वतःच्या उत्पन्नाचे 2023- 24 चे सुधारित व 2024-25 चा मूळ अर्थसंकल्पीय अंदाजपत्रकास या बैठकीत मान्यता घेण्यात येईल, अशी माहिती मुख्य लेखा वित्त अधिकारी शिवकाश चन्ना यांनी दिली आहे.