रत्नाळी येथील जय दुर्गा माता ताडी केंद्रावर बिनधास्तपणे सी.एच.शिंदीचे पॅकिंगसाठी कॅरीबॅगचा खुल्ला वापर; उघडा डोळे बघा नीट..!
मुख्याधिकारी साहेब उंटावर बसून शेळ्या हकालणे बंद करा.!
धर्माबाद:- (म. मुबशिर) धर्माबाद शहरातील रत्नाळी येथे जय दुर्गा माता ताडी विक्री केंद्रावर केंद्र शासनाने पर्यावरनाचा समतोल राखण्यासाठी संपुर्ण देशभरात प्लास्टिक च्या वापरावर बंदी घातली आहे, परंतु धर्माबाद येथील रत्नाळी येथे जय दुर्गामाता ताडी विक्री केंद्रावर CH मिश्रित असलेली शिंदी कॅरीबॅग चा वापर करून मोठ्या प्रमाणात संपूर्ण शहरात व लगतच्या खेड्यापाड्यात पार्सल केली जात आहे.सदरील ताडी केंद्रावर कॅरीबॅगचा खूप मोठ्या प्रमाणात साठा असून तो शिंदी एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नेण्यासाठी पांढऱ्या रंगाच्या प्लस्टिक चा वापर दिवसेंदिवस सर्रासपणे उपयोगात येत आहे.
या ताडी केंद्रावर बाहेरील लोक शिंदीचे सेवन करण्यासाठी येत आहेत व पार्सल बंदी असलेल्या प्लास्टिक मध्ये घेऊन जात असून, सदरील एवढ्या मोठ्या गंभिर प्रश्नाकडे नगरपालिका मुख्याधिकारी काडी मात्र लक्ष देत नाहीत व जाणूनबुजून प्रकरण दुर्लक्षित करत आहेत. याचा नाहक त्रास शहरातील लोकांना होत आहे.शहरात दुर्गंधी पसरत असून रस्त्यावर ठिकठिकाणी फेकून दिलेले कऱ्यरिबाग जनावरे खात असून त्यांचे आरोग्य धोक्यात येत आहे.वारंवार तक्रारी करुन ही कार्यवाही होत नसल्याचे गौबंगाल काय असा सवाल उपस्थित होत मुख्याधिकारी काय उंटावर बसून शेळ्या हाकलण्याचे काम करीत आहे का अशी शहरात चर्चा आहे.गरीब ,कष्टकरी जनतेस नगरपालिकेच्या प्रशासनाने नाहक त्रास देऊन त्यांच्याकडून प्लास्टिक वापरात आणल्यामुळे पाच हजार रुपये एवढा मोठा दंड मागील एक ते दोन वर्षपूर्वी आकारण्यात आला होता व जनजागृती सुद्धा घंटागाडी मार्फत करण्यात आली होती, परंतु आज घडीला अमलबजावणी होत नसल्याचे स्पष्ट दिसून येत आहे.
सदरील ताडी दुकान मालकावर आशीर्वाद कोणाचे असा गंभीर प्रश्न जनमानसात उपस्थित होत आहे.गेल्या वर्षी दि.05/09/2023 रोजी रत्नाळी च्या ताडी विक्री केंद्रावर कार्यवाही करण्यात यावी यासाठी लेखी तक्रार देऊन सुद्धा अद्यापही कार्यवाही मात्र शुन्य असल्याने नगरपालिका झोपेचे सोंग घेणाऱ्या मुजोर मुख्याधिकारी यांनी जागृत करण्यासाठी तीन महिन्यांच्या प्रदीर्घ कालावधीनंतर दि.14/02/2024 रोजी पुनश्च एकदा सदरील केंद्रावर नगर पालिका प्रशासन मार्फत धाड मारून दंड आकरण्यात यावा अशी तक्रार म.मुबशिर व अरुण सोनटक्के यांनी केली असून नगर पालिकेच्या क्षेत्रात ताडी विक्री करण्यासाठी नगरपालिकेच्या ना हरकत प्रमाणपत्राची नितांत गरज असते परंतु सदर केंद्र मालकाने सगळे नियम धाब्यावर बसवून ताडी केंद्र चालवण्यासाठी ताडी मालकास कोणत्या आधारे परवानगी देण्यात आली असा गंभीर प्रश्न निर्माण होत आहे. ना. हरकत प्रमाणपत्र नसल्यास सदरील ताडी विक्री केंद्रावर कार्यवाही का होत नाही? व अनेक वेळा कार्यवाही करण्यासाठी तक्रार केली असून मुख्याधिकारी साहेब या CH मिश्रित शिंदी केंद्रावर व त्याच्या मालकावर कार्यवाही करतील का किंवा असेच आशीर्वाद या ताडी केंद्रावर बनून राहील का ? यावर सर्व धर्माबाद वासीयांचे लक्ष लागले आहे.