क्राईम

नांदेड ग्रामीण पोलीसांनी जबरी चोरी व मोबाईल चोरीतील आरोपीतांना मुद्देमालासह केले गजाआड

पोलीस स्टेशन नांदेड ग्रामीण जि. नांदेड हद्दित मोबाईल चोरीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले असुन मोबाईल चोरीचे प्रमाण कमी करुन मोबाईल चोराना अटक करुन गुन्हयातील गेला मुद्देमाल जप्त करण्यासाठी मा. श्रीकृष्ण कोकाटे, पोलीस अधिक्षक साहेब, नांदेड, मा. अबिनाश कुमार, अपर पोलीस अधिक्षक साहेब, नांदेड, मा. सुशीलकुमार नायक साहेब, उपविभागीय पोलीस अधिकारी, उपविभाग इतवारा, नांदेड यांनी सदर मोबाईल चोरीना आळा घालुन आरोपीतांचा शोध घेण्याबाबत सुचना दिल्या असता पोलीस स्टेशन नांदेड ग्रामीण येथील प्रभारी अधिकारी एन.एस.आयलाने, पोलीस निरीक्षक, श्रीधर जगताप, सहा. पोलीस निरीक्षक यांनी गुन्हे शोध पथकातील महेश कोरे, पोलीस उप निरीक्षक, विक्रम वाकडे, प्रभाकर मलदोडे, ज्ञानोबा कवठेकर, शेख सत्तार मगदुम, अर्जुन मुंडे, संतोष बेल्लुरोड, शिवानंद तेजबंद, श्रीराम दासरे, शिवानंद कानगुले,
सायबर सेल नांदेड यांना योग्य त्या सुचना देवुन पोलीस स्टेशन नांदेड ग्रामीण येथे दाखल असलेला गु.र.नं. 855/2023 कलम 379 भा.दं.वी. तसचे गु.र.नं. 54/2024 कलम 392,34 भा.दं.वी. मधील चोरीस गेलेला मोबाईल व अज्ञात आरोपीचा शोध घेणे बाबत आदेशित केले असता गुन्हे शोध पथकातील प्रमुख व अंमलदार यांनी आपले कौशल्य वापरुन गुप्त बातमीदारामार्फत मिळालेल्या माहितीच्या आधारे नांदेड ग्रामीण पोलीसानी सापळा रचुन आरोपी नामे शेख समीर शेख चाँद वय 24 वर्ष व्यवसाय बेकार रा. घर नं.535 वाजेगाव ता.जि. नांदेड यास ताब्यात घेवुन नमुद दाखल गुन्हयासंबंधाने व इतर मोबाईल चोरीतील गुन्हयासंबंधाने विश्वासात घेवुन विचारपुस केली असताना सदर आरोपीने गुन्हा केल्याचे कबुल करुन पाच मोबाईल काढुन दिले. ते मोबाईल नांदेड ग्रामीण पोलीसानी जप्त केले आहेत. त्याचे वर्णन खालील प्रमाणे आहे.
15,000/- एक निळ्या रंगाचा SAMSUG कंपनीचा मोबाईल ज्याचा IMEI NO.350961874645566,354107554645569 असा असलेला कि.अं.
12,000/- एक काळ्या व लाल रंगाचा VIVO कंपनीचा 1901 मोबाईल ज्याचा IMEI NO862745045799316, 862745045799308 असा असलेला कि.अं.
10,000/- एक पिस्ता रंगाचा NARZO कंपनीचा 501 मोबाईल ज्याचा IMEI NO.862065051395838, 862065051395820 असा असलेला कि.अं.
7,000/- एक काळा व ब्राऊन रंगाचा I-TEL कंपनीचा A-25 मोबाईल ज्याचा IMEI NO.355168711723920, 355168711723938 असा असलेला कि. अं.
5,000/- एक फिकट निळा रंगाचा OPPO कंपनीचा मोबाईल ज्याचा बंद स्थितीत असलेला कि.अं. एकुण  49,000/- रु. आहेत. सदर गुन्हयाचा मा. वरीष्ठांचे मार्गदर्शनात अधिक तपास सपोउपनि शेषराव शिंदे पो.स्टे. नांदेड ग्रा. हे करीत
पोलीस स्टेशन नांदेड ग्रामीण गु.र.नं. 54/2024 कलम 392,34 भा.दं.वी. गुन्हयात आरोपी 1) सुमीत संतोष सरोदे वय 19 वर्ष रा. सिडको, नांदेड, 2) अजय उर्फ लड्या भगवान जोगदंड वय 22 वर्ष रा. सिडको, नांदेड, 3) साईनाथ लक्ष्मण सरसमकर वय 32 वर्ष रा. सिडको, नांदेड यांना ताब्यात घेवुन तपास केला असता त्यांनी गुन्हयाची कबुली देवुन गुन्हयात गेलेला मुद्देमाल काढुन दिला. तसेच गुन्हयात आरोपीतांनी वापरलेली मोटार सायकल व एक खंजर जप्त करण्यात आला आहे. त्याचे वर्णन खालील प्रमाणे आहे.
20,000/- एक हिरो कंपनीची मोटार सायकल जिचा क्रमांक MH-26 CJ-2740 कि.अं.
एक POCO कंपनीचा M2 PRO मोबाईल कि.अं. 13,999/-, 100/- एक लोखंडी खंजर जु.वा. कि.अं. एकुण 34,099/-
सदर गुन्हयाचा मा. वरीष्ठांचे मार्गदर्शनात अधिक तपास महेश गायकवाड पोलीस उप निरीक्षक, पो.स्टे. नांदेड ग्रा. हे करीत आहेत.
सदर गुन्हयातील आरोपीकडुन जप्त करण्यात आलेले मोबाईल मुळ मालकाना परत करण्यासाठी सदर मोबाईलचे IMEI नंबर वरुन शोध घेण्याकरिता सायबर सेल नांदेड यांना पत्र पाठवण्यात आले आहे. व जिल्हातील इतर पोलीस स्टेशनला बिनतारी संदेश पास केला आहे. जप्त केलेल्या मुद्देमालाबाबत व केलेल्या कामगिरीबाबत पोलीस स्टेशन नांदेड ग्रामीण येथील गुन्हे शोध पथकातील टिमचे श्री. श्रीकृष्ण कोकाटे, पोलीस अधिक्षक साहेब, नांदेड, मा. अबिनाश कुमार, अपर पोलीस अधिक्षक, नांदेड, मा. सुशीलकुमार नायक, उपविभागीय पोलीस अधिकारी, उपविभाग इतवारा, नांदेड यांनी अभिनंदन केले आहे.

Munawar Khan

या पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो नांदेड न्यायालयांतर्गत राहील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button