स्पोर्ट्स

स्व. नितीन लहाने स्मृतीचषक स्पर्धेचे . अप्पर जिल्हाधिकारी प्रताप काळे यांच्या हस्ते उद्घाटन संपन्न

परभणी/ सेलू येथील नूतन महाविद्यालय मैदानावर नितीन व्यायाम शाळा कला, क्रीडा व सांस्कृतिक युवक मंडळाच्या वतीने शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीदिनानिमित्त आयोजित राज्यस्तरीय निमंत्रितांच्या स्व. नितीन लहाने स्मृतीचषक क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन आज (दि.१५) रोजी अप्पर जिल्हाधिकारी प्रताप काळे यांच्या हस्ते संपन्न झाले.या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रा. डॉ. विनायक कोठेकर हे होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून तहसीलदार दिनेश झांपले, वैद्यकीय अधिकारी डॉ. जनार्धन गोळेगावकर, माधव यादव, एस.एन.केंद्रे, श्रीपाद कुलकर्णी, विनायक खंडागळे, आप्पा डख, डॉ. आबासाहेब डख याच बरोबर कार्यक्रमाचे आयोजक हरिभाऊ लहाने आदी उपस्थित होते.

या२४ व्या स्पर्धेत राज्यातील नामवंत १६ संघाचा समावेश आहे. या सामन्यात २० षटकांचे सामने खेळविण्यात येणार आहेत. खेळाडूंना गणवेश, भोजन, निवास व्यवस्था मोफत करण्यात आली असून विजेत्या संघास रोख १ लाख रूपये चषक व उपविजेता संघास ५१ हजार तर मालिकावीर २५ हजार रोख बक्षीस व चषक देण्यात येणार असल्याची माहिती नितीन कला क्रीडा मंडळाचे संदीप लहाने यांनी सांगितले.

Munawar Khan

या पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो नांदेड न्यायालयांतर्गत राहील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button