मराठवाडा

शिवसेनेने बांधकाम विभागाला ठोकले कुलुप

             परभणी,( जिल्हा प्रतिनिधी) : शहरातील रस्ते बांधकामावरील स्थगिती तात्काळ उठवावी व रस्त्यांचा प्रश्‍न तात्काळ मार्गी लावावा, या मागणीसाठी आमदार डॉ. राहुल पाटील यांनी बुधवारी  शिवसैनिकांसह सार्वजनिक बांधकाम विभागात दाखल होत कार्यालयाच्या मुख्य प्रवेशद्वाराला कुलुप ठोकले. यावेळी आक्रमक झालेल्या शिवसैनिकांनी जोरदार घोषणाबाजी करत शासनाचा निषेध व्यक्त केला.
           शहरातील सर्व रस्त्यांची अत्यंत दयनीय अवस्था झाली आहे. या प्रश्‍नावर मनपा, जिल्हाधिकारी, राज्य शासन यांना वारंवार निवेदने देण्यासह मोर्चे, आंदोलने करण्यात आली आहेत.
आ. डॉ. पाटील यांनी विधानसभेत वारंवार रस्ते बांधकामावरील स्थगिती उठवावी अशी मागणी केलेली आहे. परंतु, निष्क्रीय राज्य शासनाने गेल्या दोन वर्षापासून परभणीकरांच्या या मागणीला केराची टोपली दाखवली आहे. मनपा हद्दीतील 17.5 किलोमीटरचे रस्ते सार्वजनिक बांधकाम विभागाकडे हस्तांतरित करण्यात आले होते. या रस्ते कामासाठी मागील शासनाने 82 कोटींचा निधी मंजूर केला होता. त्यानंतर रस्त्यांच्या कामांचे भूमिपूजनही झाले होते. परंतू सरकार बदलल्यानंतर संबंधित 82 कोटींच्या रस्ते कामांना स्थगिती देण्यात आली. त्यानंतर आ. डॉ.पाटील यांनी वेळोवेळी हा प्रश्‍न विधानसभेत मांडून रस्ते बांधकामावरील स्थगीती उठवण्याची मागणी केली होती. तसेच उच्च न्यायालयाच्या छत्रपती संभाजीनगर येथील खंडपिठात याचीका दाखल केली होती. त्यावर मा. न्यायालयाने या रस्त्यांसाठी आलेला निधी इतरत्र न खर्च करता राखीव ठेवण्यात यावा, असे आदेश दिले होते. परंतु, दुर्देवाने राज्य शासनाने रस्ते कामासंदर्भात निर्णय घेतला नाही.
           शहरातील जेल कॉर्नर ते अपना कॉर्नर, मोठा मारोती ते उघडा महादेव या दोन मार्गासह अन्य प्रमुख रस्त्यांचा प्रश्‍न कायम राहील्याने नागरीकात संताप व्यक्त होत आहे. त्यामुळे परभणी विधानसभा मतदार संघाचे आ.डॉ.पाटील यांनी बुधवारी आक्रमक पवित्रा घेत शिवसैनिकांसह सार्वजनिक बांधकाम विभागात दाखल होत कार्यालयाच्या मुख्य प्रवेशद्वाराला कुलुप ठोकले. यावेळी आक्रमक झालेल्या शिवसैनिकांनी जोरदार घोषणाबाजी करत शासनाचा निषेध व्यक्त केला.
           यावेळी शिवसेना सहसंपर्क प्रमुख डॉ. विवेक नावंदर, उपजिल्हा प्रमुख संजय गाडगे, सदाशिव देशमुख, तालुका प्रमुख नंदू पाटील, युवासेना जिल्हा प्रमुख अर्जुन सामाले, कृउबा सदस्य अरविंद देशमुख,महिला विधानसभा संघटक अंबिका डहाळे, युवासेना तालुका प्रमुख संदीप झाडे, दलित आघाडी तालुका प्रमुख सुभाष जोंधळे, शहर प्रमुख ज्ञानेश्वर पवार, माजी शहर प्रमुख अनिल डहाळे, युवा सेना शहर प्रमुख बाळराजे तळेकर, विशु डहाळे, अमोल गायकवाड, दिनेश बोबडे, गजानन देशमुख, प्रशास ठाकूर, सुशील कांबळे, शिक्षक सेनेचे मराठवाडा कार्याध्यक्ष बाळासाहेब राखे, वितरण कर्मचारी अभियंता सेनेचे प्रसाद सिंगणापूरकर, शहर संघटक वंदना कदम आदीसह शिवसेना, युवासेना, महिला आघाडी पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

Munawar Khan

या पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो नांदेड न्यायालयांतर्गत राहील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button