प्लास्टिकमुक्त उपक्रमात ग्रामसेवकांकडून 22 किलो प्लास्टिकचे संकलन
श्रीक्षेत्र माळेगाव यात्रा मिडिया सेंटर,11- यावर्षीची यात्रा प्लास्टिकमुक्त व कचरामुक्तीचा संकल्प करण्याचे आवाहन जिल्हा परिषदेच्या प्रशासक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल यांनी केले आहे.
ही संकल्पना साक्षात उतरवण्यासाठी लोहा तालुक्यातील ग्रामसेवक बांधवांनी स्वच्छतेची प्रतिज्ञा घेऊन प्लास्टिक व कचरामुक्तीसाठी 10 जानेवारी रोजी सर्व ग्रामसेवकांनी मिळून 22 किलो प्लास्टिकचे संकलन केले.
जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप माळोदे, उप मुख्य कार्यकारी मंजूषा जाधव, पाणी व स्वच्छता विभागाचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी नारायण मिसाळ यांनी या उपक्रमास शुभेच्छा दिल्या स्तुत्य उपक्रमाचे स्वागत केले.
या उपक्रमात एकाच दिवसात 22 किलो प्लास्टिक कचऱ्याचे संकलन केले. या उपक्रमामध्ये गट विकास अधिकारी डी. के. आडेराघो, विस्तार अधिकारी धनंजय देशपांडे, डी.आय. गायकवाड, ग्रामसेवक संघटनेचे तालुकाध्यक्ष गजानन शिंदे, सचिव शैलेश बिस्मिला, उपाध्यक्ष रमेश राठोड, अमृत शिंदे, हरिहर विश्वासराव, शरद गीते, कृषी पदवीधर संघटनेचे तालुकाध्यक्ष अरुण चौधरी, संदीप कछवे, सचिव सय्यद इब्राहिम, सौ. लींगापुरे, सौ. पांचाळ, सौ. टोम्पेसह तालुक्यातील ग्रामसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.