संदीप पाटील यांनी सुरू केलेली गुरुजी फाऊंडेशन च्या वतीने विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटपाचा कार्यक्रम संपन्न…
धर्माबाद: – (म. मुबशिर) नायगाव विधानसभा मतदारसंघातील लोकप्रिय शेतकरी नेते तथा उद्योगरत्न मा.श्री मारोतराव पाटील कवळे गुरुजी यांच्या सामाजिक कार्याच्या तळमळीतील एक महत्त्वाचे पाऊल म्हणजे मा.संदीप पाटील कवळे यांनी स्थापन केलेले गुरुजी फाउंडेशन होय आणि या गुरुजी फाउंडेशन च्या वतीने धर्माबाद येथे झालेल्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करून सामाजिक कार्याची सुरुवात करण्यात आली.
दि. 27/12/2023 रोजी “गुरुजी फांउडेशन” कुसुमनगर वाघलवाडा ता. उमरी जि , नांदेड तर्फे धर्माबाद तालुक्यातील शाळांना, निवासी अपंग विद्यालय, व्यंकटेश मूकबधिर विद्यालय, निवासी मतिमंद विद्यालय, निवासी ग्रामीण व्यवसाय प्रशिक्षण केंद्र धर्माबाद येथिल विद्यार्थ्यांना “गुरुजी फाउंडेशन” चे अध्यक्ष मा. श्री. संदीप पा. कवळे(अध्यक्ष गुरुजी फाउंडेशन )मा. पुजाताई पा. कवळे (संचालिका गुरुजी फाउंडेशन ) व मान्यवरांच्या उपस्थित शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले.
सदरील कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मूकबधिर विद्यालयाचे मु. अ. श्री. देविदास दत्तात्रय जोशी व प्रमुख अतिथी मा. श्री. दत्ताहरी पा. चोळाखेकर मा. श्री. बोलमवाड साहेब. नगरसेवक,गजानन कुरुंदे,मा. श्री.भांगे सर मु. अ.निवासी अपंग विद्यालय श्री. हाळे सर मु. अ. मतिमंद विद्यालय तसेच मा. श्री. लक्ष्मण पा. हरेगावकर मा.श्री. तानाजी पा. हरेगावकर हे होते. गुरुजी फाउंडेशन चे उपाध्यक्ष श्री. मधुकर पा. शिंदे, श्री. सुनील जोगदंड सचिव श्री. अनिल पा. वडजे कोषाध्यक्ष यासोबतच श्री. महेंद्र पा. हरेगावकर श्रो. गोविंद पा. धानोरकर व धर्माबाद शहरातील प्रतिष्टीत मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली व प्रास्ताविक करताना गुरुजी फाउंडेशनचे कार्यवाहक श्री. यु.जी कदम सर यांनी गुरुजी फाउंडेशन चे उद्देश व हेतू मांडले व सामाजिक कार्याचे व्याप्ती स्पष्ट केली. लगेच मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांना शालेय साहित्य व खाऊ वाटप करण्यात आले.
याप्रसंगी बोलताना गुरुजी फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष माननीय श्री संदीप पाटील कवळे यांनी गुरुजी फाउंडेशनच्या वाटचाली संदर्भात भूमिका मांडली व संचालिका माननीय पूजाताई पाटील कवळे यांनी गुरुजी फाउंडेशनच्या यांनी भावी कार्यास शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री बाबुराव भोसले समन्वयक गुरुजी फाउंडेशन यांनी केले. व आभार श्री नादरे साहेब उमरी कार्यालयीन पी.आर.ओ यांनी मांडले.