जिला

श्रीक्षेत्र माळेगाव तालुका लोहा येथील श्री खंडोबाची यात्रा दिनांक 10 ते 14 जानेवारी 2024 दरम्यान होणार

नांदेड,27- दक्षिण भारतात प्रसिद्ध असलेल्या श्रीक्षेत्र माळेगाव तालुका लोहा येथील श्री खंडोबाची यात्रा दिनांक 10 ते 14 जानेवारी 2024 दरम्यान होणार आहे. या यात्रेत भाविकांनी प्‍लास्टिक पिशवी ऐवजी कापडी पिशवीचा वापर करावा, असे आवाहन नांदेड जिल्‍हा परिषदेच्‍या मुख्‍य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल यांनी केले आहे.

यात्रेसाठी जिल्हा परिषद प्रशासनाच्या वतीने तयारी सुरू करण्यात आली आहे. यावर्षी प्लास्टिकमुक्त यात्रा ठेवण्यासाठी संकल्प करण्यात आला आहे. माळेगाव यात्रेत विविध ठिकाणाहून घोडे, गाढव, पशु प्रदर्शनात गाय, बैल, विविध पशुपक्षी येत असतात. जर प्लास्टिक पिशव्या जनावरांच्या खाण्यात आल्‍या तर जनावरांच्‍या आरोग्‍यावर विपरीत परिणाम होतो. बहुतांश वेळा यात जनावरांचा मृत्यू देखील होऊ शकतो. शिवाय पर्यावरणही दूषित होते. यासाठी भाविकांनी प्लास्टिक पिशवीला पर्याय म्हणून कापडी पिशवीचा वापर करावा असे आवाहन करण्‍यात आले आहे.

यासाठी ग्रामीण भागातील स्वयंसहाय्यता संघ महिला बचत गटांकडून तयार करण्यात आलेल्या कापडी पिशवी यात्रेत खरेदीसाठी उपलब्‍ध करून देण्‍यात येणार आहेत. व्यावसायिकांनी आपल्या वस्तू ग्राहकांना विकल्यानंतर प्लास्टिक पिशवी ऐवजी कागदाचे पाऊच अथवा कापडी पिशवी द्यावी. व्यवसायिकांनी यात्रेत येतानाच कापडी पिशव्या सोबत आणाव्यात किंवा यात्रेमध्ये कागदी पाऊच व कापडी पिशव्यांचे गाळे महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवोन्नती अभियान जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा नांदेड या विभागा अंतर्गत एक, दोन व पाच रुपये दारात कापडी पिशव्‍या उपलब्‍ध करुन देण्‍यात येणार आहेत.

संबंधित व्यावसायिक कापडी पिशव्यांची आगावू मागणी करुन शकतात. यासाठी लोहा तालुक्यातील वडेपुरी येथील अष्टविनायक स्वयं सहाय्यता समूह- 9527022154, अनुसया स्वयं सहायता समूह- 9767248285, श्रावणी स्वयं सहायता समूह- 8888586115, सहेली स्वयंसहायता समूह- 9370993399 व गायत्री स्वयं साहित्य समूह- 9921582667 यांच्याशी संपर्क साधावा. तसेच माळेगाव यात्रेदरम्‍यान स्वयं सहाय्यता समूहाचे कापडी पिशव्‍याचे स्टाँल विक्रीसाठी राहणार आहेत.

 

तरी श्रीक्षेत्र माळेगाव यात्रा प्लास्टिकमुक्‍त ठेवण्‍यासाठी नागरीकांनी प्रतिसाद द्यावा, असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप माळोदे, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक डॉ. संजय तुबाकले, ग्राम पंचायत विभागाच्या उप मुख्य कार्यकारी अधिकारी मंजुषा कापसे, जिल्हा पाणी व स्वच्छता मिशनचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी नारायण मिसाळ यांनी केले आहे.

 

Munawar Khan

या पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो नांदेड न्यायालयांतर्गत राहील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button