१२ वी सायन्स च्या विद्यार्थी व पालकांसाठी करिअर मार्गदर्शन सेमिनार
नांदेड – एम आय टी ए डी टी विद्यापीठ पुणे व सेवा इव्हेंट यांच्या संयुक्त विद्यमाने १२ वी सायन्स च्या विद्यार्थी व पालकांसाठी करिअर मार्गदर्शन सेमिनार सोमवार दिनांक २५ डिसेंबर २०२३ रोजी सकाळी ११ वाजता कुसुम सभागृह नांदेड येथे आयोजित करण्यात आले होते. सदर कार्यक्रमात बारावी नंतरच्या उपलब्ध संधी, प्रवेशप्रक्रिया, शिष्यवृत्ती, आवश्यक कागदपत्रे अशा विविध विषयावर तज्ञ मार्गदर्शक यांच्याकडून सखोल मार्गदर्शन केले गेले. एम आय टी ए डी टी विद्यापीठ पुणे येथील डॉ. उल्हास माळवदे, डॉ. प्रतिभा जगताप, डॉ. राहुल सोनकांबळे यांनी उपस्थित विद्यार्थी व पालक यांना मार्गदर्शन केले.
यावेळी डॉ. उल्हास माळवदे म्हणाले करिअर निवडताना अंधानुकरण न करता तज्ञ मार्गदर्शकांचा सल्ला घ्यावा. स्पर्धा खूप आहे त्यामुळे वेळेचे नियोजन करून उत्तम मार्क मिळवण्याचा प्रयत्न करावा.
प्रा. राहुल सोनकांबळे यांनी एम आय टी ए डी टी विद्यापीठाच्या विविध करिअर कोर्सेस ची माहिती सांगितली. एम आय टी नेहमीच विद्यार्थी केंद्रित उपक्रम राबवत असते. त्याचा फायदा विद्यार्थ्यांना त्यांच्या करिअर निवडीसाठी आणि भविष्यासाठी निश्चितपणे होतो.
डॉ. प्रतिभा जगताप यांनी मर्चंट नेव्ही या वेगळ्या करिअर संधी ची ओळख करून दिली. मॅनेट पुणे यांच्यामार्फत उपलब्ध असणाऱ्या मरीन इंजिनीअरिंग आणि नॉटीकल सायन्स या कोर्स बद्दल उपयुक्त माहिती दिली.
एम आय टी ए डी टी विद्यापीठाचे कार्यकारी अध्यक्ष व कुलगुरू प्रा. डॉ. मंगेश कराड अशा उपक्रमांना नेहमीच प्रोत्साहन देतात.
सदर कार्यक्रमाला नांदेड येथील विद्यार्थी व पालक बहुसंख्येने उपस्थित होते.
सूत्रसंचालन श्री. दिनेश कवडे यांनी केले व सेवा इव्हेंट चे श्री. अक्षयकुमार भंडारी यांनी आभार मानले.