विविध मागण्यासाठी ग्रामपंचायत सदस्याचे जिल्हापरिषद परिसरात आमरण उपोषण
नांदेड: जिल्ह्यातील पेठवडज येथील ग्रामपंचायत सदस्यासह ग्रामस्थांचे जिल्हा परिषदेच्या गाडी वाहन तळाच्या प्रांगणात आमरण उपोषणास प्रारंभ केला असुन पेठवडजच्या नारायण काळबा गायकवाड यांच्यासह अनेकांनी मौ. पेठवडज येथील निजाम कालीन शाळेचे इमारतीचे काम अतिशय निकृष्ट दर्जाचे झाले आहे. सदर शाळेच्या कामाकरीता गावातील जनतेने १० % लोकवाटा भरला आहे. त्यामुळे पेठवडज येथील नागरीकांना अपेक्षा होती की, शाळेचे काम दर्जेदार होईल असे वाटत होते. पण झाले उलटेच.
या कामामध्ये मा. शिक्षणाधिकारी प्रा., सर्व शिक्षा अभियानचे कार्यकारी अभियंता व सर्व शिक्षा अभियानचे कनिष्ठ अभियंता यांनी संबंधित बांधकाम एजन्सी सोबत संगनमत करून काम अतिशय निकृष्ट दर्जाचे केले आहे. या कामाची पुरेपूर चौकशी करून पुढील काम करण्यासाठी बांधकामाला स्थगिती देवून जिल्हा परिषद कार्यकारी अभियंता बांधकाम यांच्या अध्यक्षतेखाली कमिटी नेमून पुढील काम चालू करण्यासाठी पुढाकार घ्यावा.
तसेच निकृष्ट दर्जाच्या झालेल्या कामाची गुणानियंत्रका मार्फत चौकशी करुन योग्यती कार्यवाही करावी
जेणेकरून यात कोणी दोषी आढळून आल्यास व टक्केवारी घेवून काम केले त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करण्यात यावी तसेच यापूर्वीच्या मागण्या त्यात १. प्राथमिक आरोग्य केंद्राची इमारत व कर्मचारी निवाऱ्याची इमारत पुर्ण मोडकळीला आले असून त्या बांधकामाच्या निधीसाठी आपल्या कार्यालयाकडे वारंवार पाठपुरवठा केला आहे. पशुवैद्यकीय दवाखाना श्रेणी -१ ची इमारत व कर्मचारी निवाऱ्याची इमारत पुर्ण मोडकळीला आले असून त्या बांधकामाच्या निधीसाठी आपल्या कार्यालयाकडे वारंवार पाठपुरावा केला आहे.
घरकूल लाभार्थीचे घरकूल लाभार्थ्यांना शासन निर्णया प्रमाणे घरकूल मंजूरी
उपरोक्त कामे देखील खोळंबली आहेत अशा असंख्य मागण्या घेत ग्रामपंचायतीचे नारायण गायकवाड यांच्यासह अनेकांनी उपोषणास प्रारंभ केला असुन आता नवनियुक्त मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करनवाल या काय भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष वेधले आहे.