जिला

जल जीवन मिशन कार्यक्रमांतर्गत नांदेड जिल्ह्यात एकूण 1234 नळ

नांदेड,14- केंद्र शासनाच्या महत्त्वाकांक्षी जल जीवन मिशन कार्यक्रमांतर्गत नांदेड जिल्ह्यात एकूण 1234 इतक्या नळ पाणी पुरवठा योजना हाती घेण्यात आलेल्या आहेत. जल जीवन मशीनची कामे गुणवत्तापूर्ण व जलद गतीने पूर्ण करण्यात येत आहेत. मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल वेळोवेळी सदरील कामांचा वारंवार आढावा घेऊन सर्व यंत्रणांबरोबर समन्वय साधत कामांची गती व गुणवत्ता दोन्ही बाबतीत जिल्हा आज रोजी आघाडीवर नेलेला आहे.

या कामी प्रकल्प संचालक डॉ. संजय तुबाकले कार्यकारी अभियंता अमोल पाटील ह्या दोघांच्या मार्गदर्शनामुळे आज रोजी जिल्ह्यातील एकूण 231 इतक्या गावांचे हर घर जल सर्टिफिकेशन पूर्ण झालेले आहे. सर्व गट विकास अधिकारी, उप अभियता, कंपनीचे अकोलवार व जिल्हा परिषतेचे सर्व शाखा अभियंता, कंपनीचे सर्व अभियंते हे रात्रंदिवस काम करून जलजीवन मिशनची कामे जलद गतीने पूर्ण करण्याकरिता प्रचंड मेहनत घेत आहेत.

अनेक ठिकाणी असलेल्या जागेच्या उपलब्धतेच्या अडचणी मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी अनेक वेळा बैठका घेऊन, संपर्क अधिकारी नेमून, सर्व गट विकास अधिकारी व सर्व उपाभियंता यांचेशी योग्य समन्वय ठेवून निकाली काढली आहेत. टाटा कन्सल्टन्सी या थर्ड पार्टी इन्स्पेक्शन टीमने वेळोवेळी कामांना भेटी देऊन कामे कटाक्षाने गुणवत्ता पूर्ण करून घेत आहेत. वेळप्रसंगी कंत्राटदारांची कटूता घेऊन त्रुटी असल्यास त्या तात्काळ दूर करूनच रिपोर्ट देत असल्यामुळे सर्व कामे चांगल्या दर्जाची होत आहेत. वेगवेगळ्या यंत्रणा, अभियंते कामांना भेटी देऊन वेळोवेळी व्हाट्सअप ग्रुप वर कामाचे फोटो टाकतात. गुणवत्ता खराब असल्यास मुख्य कार्यकारी अधिकारी, प्रकल्प संचालक तसेच कार्यकारी अभियंता लगेच सूचना करून त्रुटी दूर करून कामे चांगल्या दर्जाची करून घेत आहेत. सध्या जिल्ह्यातील जलजीवन मिशनच्या कामांना गती आली असून सर्वांचे लक्ष मार्च 2024 पर्यंत सर्व कामे पूर्ण करण्याचे लक्ष आहे.


आज गुरुवार दिनांक 13 डिसेंबर रोजी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल यांनी मुदखेड तालुक्यातील मौजे बारड, तिरकसवाडी, डोंगरगाव, वैजापूर तसेच अर्धापूर तालुक्यातील बामणी येथील जलजीवन मिशन अंतर्गत प्रगती प्रथावर असलेल्या नळ पाणी पुरवठा योजनांच्या कामांना प्रत्यक्ष भेट देऊन कामांची पाहणी करून समाधान व्यक्त केले. याप्रसंगी पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता अमोल पाटील उपस्थित होते.

Munawar Khan

या पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो नांदेड न्यायालयांतर्गत राहील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button