व्हिडीओहेल्थ

अत्याधुनिक नेत्र चिकित्सा सुविधा असलेल्या माहेश्वरी नेत्रालयाचा शुभारंभ

नांदेड दि.25 नेत्र चिकित्से मध्ये अत्याधुनिक यंत्रसामग्रीचा वापर करून रुग्णांना नेत्रविकारासंबंधी सर्व अत्याधुनिक सुविधा व उपचार पद्धती देण्यासाठी डाॅ.अमृता माहेश्वरी यांचे “माहेश्वरी नेत्रालय” सुरू करण्यात आले आहे. या भव्य नेत्र रुग्णालयाचा शुभारंभ माहेश्वरी कुटुंबीयांच्या हस्ते फीत कापून करण्यात आला. या रुग्णालयात मोतीबिंदू, काचबिंदू आणि रेटिना यासारख्या अनेक नेत्र विकारावर प्रभावी उपचार पद्धती द्वारे उपचार केले जातील डॉक्टर अमृता ऋषिकेश माहेश्वरी यांनी MBBS, DNB (Ology) शंकर नेत्रालय, चेन्नई फेलोशिप मेडिकल रेटिना- नारायण नेत्रालय, बंगलोर FICGगोल्ड मेडल सह आपले वैद्यकीय शिक्षण पूर्ण केले आहे. त्यांना ज्येष्ठ निवासी वैद्यकीय अधिकारी म्हणून 1 वर्ष (नारायण मेडिकल कॉलेज, नेल्लोर) – वरिष्ठ सल्लागार लायन्स आय हॉस्पिटल नांदेड येथे कार्याचा अनुभव आहे. डॉ.माहेश्वरी यांनी प्रगत लेन्स रोपण मध्ये विशेष प्राविण्य मिळवले आहे तसेच अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय परिषदांमध्ये सहभाग नोंदवला आहे.

गेल्या 10 वर्षांपासून सतत अनेक नेत्रशिबिरांना हजेरी लावली आहे. जगातील सर्वात प्रगत तंत्रज्ञानाचा वापर करून नेत्र विकारावर प्रभावी उपचार माहेश्वरी नेत्रालयात करण्यात येत आहेत.

माहेश्वरी नेत्रालयामध्ये बिनटाक्याची व बिनाइंजेक्शनचीमोतीबिंदु शस्त्रक्रिया,कॉम्प्युटर द्वारे नेत्र तपासणी, काचबिंदु निदान व उपचार,नासूर उपचार,तिरळेपणा उपचार,कॉन्टॅक्ट लेन्स या सुविधा मिळतील. त्याचबरोबर क्लिनीक सुसज्ज ऑपरेशन थिएटर मधुमेह रुग्णांची नेत्र तपासणी या सर्व सुविधा देण्यात येतील तरी गरजू नेत्र रुग्णांनी अत्याधुनिक अशा माहेश्वरी नेत्रालयांमध्ये येऊन आपल्या नेत्रांचे विकार दूर करावेत असे आव्हान डॉ. अमृता माहेश्वरी यांनी केले आहे. पत्ता ऋषिकेश एंडोकेअर, डॉकटर लेन हॉटेल रामकृष्णा इंटरनॅशनल समोर, बस स्टॅन्डच्य बाजूला नांदेड 

Munawar Khan

या पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो नांदेड न्यायालयांतर्गत राहील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button