Uncategorized
रास्त भाव धान्य दुकानातून होणारा काळाबाजार थांबवावा
नांदेड दि.24 रास्त भाव धान्य दुकानाद्वारे गोरगरीब जनतेच्या अन्नधान्याची सोय व्हावी यासाठी अल्पदरामध्ये गहू आणि तांदूळ दिला जातो. पण यामध्ये मोठ्या प्रमाणात गैरप्रकार होत असल्याची तक्रार भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा शहर उपाध्यक्ष श्रीराम सुंकेवार यांनी केली आहे रास्त भाव दुकानदार आणि पुरवठा विभागातील अधिकारी यांच्या संगमने धान्याचा काळाबाजार करून गोरगरीब जनतेच्या तोंडातील घास पळवण्याचा प्रकार होत आहे अनेक ठिकाणी रास्त भाव धान्य दुकानदार हे नियमांचे उल्लंघन करून साठवणूक करत आहेत याची माहिती प्रशासनाला असून देखील प्रशासन त्याकडे अर्थपूर्ण दुर्लक्ष करत आहे प्रशासनाला काळ्या बाजारातील धान्या विषयी पूर्ण माहिती,पत्ता व वाहन क्रमांक देण्याचे खुले आव्हान श्रीराम सुंकेवार यांनी दिले आहे. रास्त भाव दुकानदारा मार्फत होणारा धान्याचा काळाबाजार जर त्वरित थांबवला नाही आणि त्यावर कारवाही केली नाही तर त्या विरोधात लोकशाही मार्गाने आंदोलन करण्याचा इशाराही श्रीराम सुकेवार यांनी दिला आहे