विभागीय रेल्वे व्यवस्थापक नांदेड यांनी पोलीस अधीक्षक नांदेड सह समन्वय बैठक घेतली
आज म्हणजेच 12.12.2023 रोजी, श्रीमती निती सरकार, विभागीय रेल्वे व्यवस्थापक, नांदेड विभाग यांच्या अध्यक्षतेखाली पोलीस अधीक्षक /नांदेड श्री श्रीकृष्ण कोकाटे यांच्या समवेत एक समन्वय बैठक झाली जी वरिष्ठ श्री अमित प्रकाश मिश्रा/ वरिष्ठ विभागीय सुरक्षा आयुक्त यांनी आयोजीत केली होती.
श्री राजेंद्र कुमार मीना अप्पर विभागीय रेल्वे व्यवस्थापक , श्री सूरज गुरव, पोलीस उप अधिक्षक, महाराष्ट्र पोलिसांचे इतर अधिकारी, लोहमार्ग पोलीस आणि इतर रेल्वे अधिकारी सहभागी झाले होते.
बैठकी दरम्यान श्री. अमित प्रकाश मिश्रा, वरिष्ठ विभागीय सुरक्षा आयुक्त/रेल्वे संरक्षण दल/नांदेड यांनी नांदेड जिल्ह्याच्या कार्यक्षेत्रातील रेल्वे मालमत्तेच्या चोरीच्या घटना, प्रवाशांच्या सामानाची चोरी, दगडफेक आणि अनुचित घटना यासारख्या चिंतेच्या विविध विषयांचे सादरीकरण केले. सरकारी रेल्वे पोलीस आणि महाराष्ट्र पोलीस यांच्या समन्वयाने, स्थानिक गुप्तचर माहितीची देवाणघेवाण आणि गुन्हेगारांविरुद्ध प्रभावी कायदेशीर कारवाई या प्रतिबंधात्मक उपायांभोवती पुढील चर्चा फिरली. असुरक्षित भागात विशेष पाळत/गोपनीय नजर ठेवली जाते. केबल कटिंग, गुन्हेगारांच्या टोळ्या पकडणे इत्यादी प्रकरणे रोखण्यासाठी आणि शोधण्यासाठी पोस्ट स्तरावर सर्व पोस्ट प्रभारींना विशेष पथके तयार करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
विभागीय रेल्वे व्यवस्थापक /नांदेड यांनी रेल्वेच्या जमिनीवरील अतिक्रमण आणि जमीन बळकावण्याच्या प्रयत्नांबद्दल तीव्र चिंता व्यक्त केली. एसपी/नांदेड यांनी अशा बाबींना त्यांच्या तार्किक निष्कर्षापर्यंत नेण्यासाठी त्यांच्या टीमला पूर्ण सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.
पोलीस अधीक्षक /नांदेड यांनी बाल न्याय (मुलांची काळजी आणि संरक्षण) कायदा-2015 च्या तरतुदींसह, विशेषत: बालवयीन मुलांशी संबंधित बाबी हाताळण्यासाठी अवलंबल्या जाणार्या कार्यपद्धती स्पष्ट केल्या. गुन्हेगारी प्रकरणे कमी करण्यासाठी अल्पवयीन गुन्हेगारांच्या पुनर्वसनासाठी एनजीओच्या समन्वयाने आरपीएफ, जीआरपी आणि स्थानिक पोलिसांद्वारे संयुक्त जनजागृती मोहीम सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला.